High Protein Dahi Upma recipe: प्रत्येक रविवारी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तुम्हाला जर तुम्हाला रविवारी सकाळी नाश्त्यात खास पदार्थ बनवायचा असेल तर दही उपमा बनवू शकता. हा उपमा बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. तसेच घरातील सर्व सदस्यांना देखील आवडेल. चला तर मग जाणून घेऊया दही उपमा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
दही उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्यतेल
लाल तिखट
मोहरी
कढीपत्ता
चणा डाळ
शेंगदाणे
कांदा
रवा
मीठ
दही
दही उपमा बनवण्याची कृतीदही उपमा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भाड्यांत दही घ्या. नंतर त्यात बारिक चिरलेली कोथिंबीर,हिरवी मिरची आणि पाणी घालून चांगले मिक्स करा. नंतर एका कढईत तेल गरम करा नंतर त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, चणा डाळा, शेंगदाणे टाका आणि चांगले मिसळा. नंतर त्यात रवा भाजा आणि त्यात दह्याचे मिश्रण घाला आणि चांगले शिजवा. स्वादिष्ट दही उपमा तयार आहे.