सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 75 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज?
Marathi April 28, 2025 01:25 AM

जॉब न्यूज: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने सल्लागार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु गेली आहे. ही भरती प्रक्रिया 19 एप्रिल 2025 पासून सुरु झाली आहे आणि इच्छुक उमेदवार 9 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. BIS bis.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.

शैक्षणिक पात्रता काय?

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराने संबंधित क्षेत्रातील B.Sc/B.Tech/B.E/BNYS/कृषिशास्त्र/मृदा विज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

उमेदवारांची निवड कशी होणार?

अर्जदारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे शॉर्टलिस्ट करून केली जाईल. यानंतर, निवडलेल्या उमेदवारांना तांत्रिक मूल्यमापन आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. निवडलेल्या उमेदवारांची एक वर्षाच्या करारावर नियुक्ती केली जाईल.

किती मिळणार पगार?

सल्लागार पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार रुपये पगार मिळणार आहे. ही नोकरी पूर्णपणे करारावर आधारित आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत साइटचा संदर्भ घेऊ शकतात.

कसा कराल अर्ज?

उमेदवारांनी प्रथम BIS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
नंतर मुख्यपृष्ठावरील “भरती” विभागात जा आणि संबंधित भरती लिंकवर क्लिक करा.
आता “खाते तयार करा” वर क्लिक करा, आवश्यक माहिती भरा आणि नोंदणी करा.
उमेदवारांनी लॉग इन करून पूर्ण फॉर्म भरा.
नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
शेवटी, उमेदवारांनी अर्जाची प्रिंटआउट घ्यावी आणि ती त्यांच्याकडे ठेवावी.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! विविध पदांसाठी भरती प्रक्रिया होणार, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.