Elvish Yadav: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २०२५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या हल्ल्यानंतर प्रसिद्ध यूट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवने एक भावनिक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, शहीद विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी ही त्याची कॉलेजमेट होती. दोघेही हंसराज कॉलेजमध्ये एकत्र शिकले आहेत.
एल्विश यादवने आपल्या व्लॉगमध्ये सांगितले की, त्याने एका व्हायरल व्हिडिओमध्ये हिमांशीला पाहिले आणि तिचा चेहरा ओळखला. त्याने एका कॉमन फ्रेंडला संपर्क केला, ज्याने हिमांशीला ३० वेळा कॉल केला. ३१व्या कॉलला तिने फोन उचलला आणि रडत रडत सांगितले की, तिच्या पतीला दहशतवाद्यांनी गोळी मारली. ही माहिती एल्विशने आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केली.
या घटनेनंतर एल्विश यादवने लोकांना विनंती केली की, कृपया काश्मीरमधील अशा घटनांचे व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करू नका, कारण यामुळे पीडित कुटुंबांना आणखी वेदना होऊ शकतात. यावेळी आपल्याला एक देश म्ह्णून त्यांचा भावनांचा आदर केला पाहिजे.
सध्या '' या कुकिंग रिअॅलिटी शोमध्ये सध्या काम करत आहे, यामध्ये रूबीना दिलैक, अंकिता लोखंडे, करण कुंद्रा आणि अली गोनी यांसारखे कलाकारही सहभागी आहेत. एल्विशने यापूर्वी बिग बॉस ओटीटीचा विजेता होऊन आपली ओळख निर्माण केली आहे.