Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू नदीचे पाणी अडवणे म्हणजे युद्ध छेडण्यासारखेच आहे, अशी पोकळ दर्पोक्ती पाकिस्तानने केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साधारण 3800 कोटी रुपयांचा व्यापार ठप्प होणार आहे.
एकीकडे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात महागाई आहे. असे असताना आता पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाघा बॉर्डरच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान यांच्यात दरवर्षी साधारण 3838.53 कोटी रुपयांचा द्वपक्षीय व्यापर होतो. लँड पोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेला हा आकडा आहे. यात भारताचा पाकिस्तानच्या मार्गाने अफगाणिस्तान तसेच अन्य देशांसोबत केल्या जाणाऱ्या व्यापाराचाही समावेश आहे. आता या सर्वच व्यापाराला फुलस्टॉप लागणार आहे. याचा नकारात्मक परिणाम पाकिस्तानवर पडणार आहे. कारण पाकिस्तान अनेक गोष्टींसाठी भारतावर अवलंबून आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय व्यापाराच्या माध्यमातून अनेक गोष्टीची आयात आणि निर्यात होते भारत पाकिस्तानकडून ड्राय फ्रूट्स, जिप्सम, रॉक सॉल्ट यासह इतरही बाबी आयात करतो. तर पाकिस्तान भारताकडून औषधी, केमिकल्स, फळं, भाज्या, पोल्ट्री फीड आदी निर्यात कतो. मिळालेल्या माहितीनुसार औषधनिर्माणासाठी लागणारा कच्च्या मालासाठी पाकिस्तान साधारण 30 ते 40 टक्के भारतावर अवलंबून आहे. त्यामुळे द्विपक्षीय व्यापार बंद झाल्यामुळे आता पाकिस्तानमधील औषधं महाग होणार आहेत.
पाकिस्तानची महागाई सध्या गगनाला भिडलेली आहे. चिकन घ्यायचे असेल तर पाकिस्तानात 798.89 पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. पाकिस्तानात एका लिटर दुधासाठी दूध 224 रुपये किलो आहे. अर्धा किलो ब्रेड घ्यायचे असेल तर पाकिस्तानात 161.28 रुपये मोजावे लागतात. एक डझन अंडी घ्यायची असतील तर तब्बल 332 रुपये द्यावे लागतात. एक किलो केळी घ्यायची असेल तर 176 पाकिस्तानी रुपये मोजावे लागतात. पाकिस्तानमध्ये 150 रुपये किलो टोमॅटो आहेत. पाकिस्तानमध्ये एक किलो तांदळासाठी हा तब्बल 339.56 रुपये मोजावे लागतात.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची महागाई असताना त्यांनी भारतासोबतचा व्यापार थांबवला आहे. त्यामुळे आता भविष्यात पाकिस्तानमध्ये महागाई वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाचे परिणाम त्यांनाच भोगावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.