भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानवर कोसळलं मोठं संकट, तडकाफडकी आणीबाणी जाहीर!
GH News April 27, 2025 10:08 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. भारतानं सिंधू नदी जल वाटप कराराला स्थगिती देत पाकिस्तानचं पाणी बंद केलं आहे, भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे, पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला युद्धाच्या पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आता पाकिस्तानवर आणखी एक मोठं संकट कोसळलं आहे.

पाकिस्तानी मीडियाकडून असा दावा करण्यात येत आहे की, भारतानं मुद्दामहून झेलम नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये सोडलं आहे. ज्यामुळे पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.भारताने कोणतीही माहिती न देता पाकिस्तानमध्ये पाणी सोडल्याचा आरोप तेथील अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. भारतानं झेलम नदीचं पाणी सोडण्यापूर्वी पाकिस्तानला कोणतीही कल्पना दिली नाही, त्यामुळे मुझफ्फराबादमधील पाण्याची पातळी अचानक वेगाने वाढत आहे. पाण्याची पातळी इतक्या वेगानं वाढली की, हत्तीयन बाला भागामध्ये स्थानिक प्रशासनाला इमर्जन्सीची घोषणा करावी लागली आहे. मशि‍दींमधून घोषणा देऊन, तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही घराच्या बाहेर पडू नका, घरातच राहा असे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

भारतानं कोणतीही पूर्वसूचना न देता झेलम नदीचं पाणी सोडलं, त्यामुळे मुझफ्फराबादमध्ये आम्हाला इमर्जन्सी लागू करण्याची वेळ आली, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. तेथील अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानात पाणी कसं घुसलं?

मिडिया रिपोर्टनुसार झेलम नदीचं पाणी उत्तर काश्मीरमध्ये असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यातून पीओकेमध्ये पोहोचलं. पाणी पीओकेमध्ये घुसल्यानं तेथील पाण्याच्या पातळीत अचानक मोठी वाढ झाली. त्यामुळे हे पाणी पुढे पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमधे शिरलं. यामुळे पाकिस्तामध्ये आता चांगलाच गोंधळ उडाला आहे. मात्र पाकिस्तान सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये. अचानक शहरात पाणी घुसल्यामुळे तेथील नागरिकांची चांगलीच धावपळ उडाल्याचं दिसून येत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.