नागपूर जिल्ह्यात लग्न समारंभातून परतणाऱ्या एका कुटुंबाला ट्रकने चिरडले दोघांचा मृत्यू
Webdunia Marathi April 27, 2025 11:45 PM

नागपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. येथे लग्न समारंभातून परतणाऱ्या एका कुटुंबाच्या दुचाकीला एका भरधाव ट्रकने धडक दिली. ट्रकने दुचाकीस्वार असलेल्या 3 जणांना चिरडले आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळी, एका 4 वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमी मुलाला रुग्णालयात नेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ALSO READ:

सदर अपघात कुही तालुल्यातील गोंदी फाटा येथे घडला. किशोर मेश्राम आणि गुणाबाई मेश्राम अशी मृतांची नावे आहे. तर मुलगा सार्थक मेश्राम जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ALSO READ:

किशोर मेश्राम हे काकू गुणाबाई मेश्राम आणि मुलगा सार्थक मेश्रामला घेऊन दुचाकीवरून एका लग्न समारंभातून घरी परत येताना गोंदी फाटा येथे एका दुसऱ्या वाहनाने अचानक ब्रेक लावला त्यामुळे किशोर यांचा तोल गेला आणि त्यांची दुचाकी समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली ते खाली पडले. त्याच वेळी वेगाने भरधाव येणाऱ्या एका ट्रक ने तिघांना चिरडले.या अपघातात किशोर आणि गुणाबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर 4 वर्षीय सार्थकला दुखापत गंभीर झाली.

ALSO READ:

माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सार्थकला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.