बुलढाणा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये जात महाराष्ट्रातील पर्यटकांना मदतीचा हात दिला होता. यावरच ठाकेर गटाकडून वारंवार टीका केली जात होती. यावर आता एका जाहीर सभेत बोलताना शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांच्या परदेश यात्रेवर निशाणा साधला आहे. बुलढाणा येथे झालेल्या आभार सभेत ते बोलत होते. (DCM मराठी Criticized Uddhav Thackeray on Foreign Tour pup)
शिंदे म्हणाले की, हा एकनाथ शिंदे हा लांबून बोलणारा माणूस नाही. मी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृत लोकांच्या कुटुंबीयांना भटलो. मी त्यांच्या भावना पाहिल्या, मी लाडक्या बहिणींच्या भावना पाहिल्या. ते म्हणाले तुम्ही आलात, आता आम्हाला खात्री आहे की, आम्ही पुन्हा सुरक्षित आणि सुखरुप घरी जाणार आहोत. मी तुम्हाला एवढंच सांगोत की पहलगाममधील हल्ला हा दुर्दैवी होता. म्हणूनच मी त्या ठिकाणी जाणं माझं कर्तव्य समजलं. पण त्यातही काहीजण राजकारण करत असतील, तर काय बोलणार? अशी खंतही यावेळी शिंदे यांनी बोलून दाखवली.
पुढे शिंदे म्हणाले की, मी घरातून बाहेर पडतो. पण काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. पण मी जेव्हा-जेव्हा संकट येत तेव्हा मी तिकडे जातो. काही लोक घरातून बाहेर पडले की, ते पार देशाच्या बाहेरच जातात. पण जाऊ द्या. त्यांचं त्यांना लखलाभ, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचं नाव न घेता केला आहे.
शिंदे मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या दरे या मूळगावी गेले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शिंदे म्हणाले, मी गावाला गेलो की राजकारण केलं जातंय. मी शेती करायला गेलो, असं हिणवलं जातं. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी शेती करायला नाही जाणार तर मग कशाला जाणार. काही लोक घरातून बाहेर पडतच नाहीत. ते घराच्या बाहेर पडले की पार देशाच्या बाहेरच जातात, अशी जोरदार टोलेबाजी शिंदेंनी केली.
(हेही वाचा : पाकिस्तानी नागरिकांची खैर नाही? गृहमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं )