Maharashtra Live Update : पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द
Sarkarnama April 28, 2025 06:45 AM
Pahalgam terror attack : काश्मीरमध्ये कोंबिंग ऑपरेशन

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाईला सुरूवात केली आहे. अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात आलं असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 हून अधिक लोकांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं आहे.

Pakistan visa : पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 48 तासांत पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहांनी दिलेली मुदत आज संपली असून पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा देखील आजपासून रद्द करण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.