22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे हल्ला करण्यात आला. यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशात आता मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी (Atul Kulkarni ) काश्मीरला ( Kashmir Trip ) पोहचला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याच्या काश्मीरला जाण्यामुळे एकीकडे त्याचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे त्याला ट्रोल देखील करण्यात आले आहे.
यांनी लोकांना काश्मीरला येण्याचे आव्हान केले आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगामला जाण्यापूर्वी तुम्हाला भीती वाटली नाही का?, असा सवाल बीबीसीच्या मुलाखतीत अतुल कुलकर्णी यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत अतुल कुलकर्णी म्हणाले की, " घडलेली घटना खूपच दुर्दैवी होती आणि मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. सध्याच्या या वातावरणात आपण मनातील बाजूला काढून येथे येणे खूप महत्त्वाचे आहे. "
अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्याने फोटो पोस्ट करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, हिंदोस्तां की ये जागीर है, के डर से हिम्मत भारी है| हिंदोस्तां की ये जागीर है, के नफ़रत प्यार से हारी है| चलिए जी कश्मीर चलें,सिंधु, झेलम किनार चलें|मैं आया हूँ , आप भी आएँ| अतुल कुलकर्णी यांच्या या पोस्टवरील चाहते आणि कलाकरांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
अतुल कुलकर्णी हल्ल्याबाबत बोलताना म्हणाले की, "मी श्रीनगरला आलो आहे. पहलगामला जातो आहे. मी वाचले की काश्मीरमध्ये येण्याच्या 90 % बुकींग रद्द झाल्या आहेत. हा पर्यटनाचा चांगला काळ सुरू आहे. काश्मीरी लोकांना आपल्यालाच सांभाळायचे आहे. पर्यटन फक्त पैशापुरते नाही तर पर्यटनात लोक एकमेकांशी जोडले जातात."