पंचांग -
सोमवार : वैशाख शुद्ध १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, सूर्योदय ५.५७, सूर्यास्त ६.५२, चंद्रोदय सकाळी ६.२४, चंद्रास्त सायंकाळी ७.४२, भारतीय सौर वैशाख ८ शके १९४७.
दिनविशेष -
२००१ - भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री एक वाजून सात मिनिटांनी रशियाचे ‘सोयुझ-टीएम ३२’ यान बैकनूर (कझाकस्तान) तळावरून अवकाशात झेपावले व अंतराळात जाणारे डेनिस टीटो हे पहिले पर्यटक ठरले.
२००८ - श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या क्रमांक दोनच्या तळावरून ‘पीएसएलव्ही सी-९’च्या उड्डाणाद्वारे एकाच वेळी दहा उपग्रह ध्रुवीय कक्षेत सोडण्याचा विक्रम; पन्नासावा भारतीय उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्याची किमया भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केली.