आज सोमवारी 'या' १० शेअर्समध्ये दिसेल हालचाल, मोठी कमाई करण्याची संधी मिळू शकते
ET Marathi April 28, 2025 01:45 PM
मुंबई : आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या मार्च तिमाहीच्या निकालांना गती मिळाली आहे. यासोबतच, बाजारातील गुंतवणूकदार ज्या कंपन्या उत्कृष्ट कमाई, उत्तम बॅलन्स शीट किंवा नवीन संधी दाखवत आहेत अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करत आहेत. अनेक कंपन्यांनी आपले उत्कृष्ठ तिमाही निकाल सादर केले आहेत. त्याचबरोबर लाभांशही जाहीर केले आहेत. आज सोमवारी २८ एप्रिल रोजी अशा १० शेअर्समध्ये हालचाल दिसेल. रिलायन्स इंडस्ट्रीजदेशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने जानेवारी-मार्च २०२५ या तिमाहीत चमकदार कामगिरी केली आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने या तिमाहीत २.४१ टक्के वार्षिक नफ्यात वाढ नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित नफा १९,४०७ कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचा एकत्रित महसूल जवळपास ९ टक्क्यांनी वाढून २.६१ लाख कोटी रुपये झाला. कंपनीचा रोख नफा आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १.४६ लाख कोटी रुपये होता. रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२५ च्या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या शेअरधारकांसाठी ५.५ रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. फोर्स मोटर्सफोर्स मोटर्सने उत्कृष्ट कामगिरी करत चौथ्या तिमाहीत ४३४.७ कोटीचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत २१० टक्क्यांनी जास्त आहे. कंपनीचा महसूलही १७.१ टक्क्यांनी वाढून २,३५६ कोटी रुपयांवर पोहोचला. EBITDA १८.२ टक्क्यांनी वाढून ३२९.३ कोटी रुपये झाला. एल अँड टी फायनान्सएल अँड टी फायनान्सने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या चौथ्या तिमाहीत ६३६.२ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १४.९ टक्क्यांनी जास्त आहे. निव्वळ व्याज उत्पन्न देखील ३.८ टक्क्यांनी वाढून २,४२३.२ कोटी रुपये झाले. मात्र, कंपनीचा एकूण एनपीए प्रमाण किंचित वाढून ३.२९ टक्क्यांवर पोहोचला. टाटा टेक्नॉलॉजीजटाटा समूहाच्या या आयटी कंपनीने मार्च तिमाहीत १८९ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. यामध्ये वार्षिक आधारावर २० टक्के वाढ झाली. मागील तिमाहीतील महसूल १,३०१ कोटींवरून किंचित घसरून १,२८६ कोटी रुपये झाला. टाटा टेक्नॉलॉजीजने प्रत्येक शेअरसाठी ८.३५ रुपयांचा अंतिम लाभांश आणि ३.३५ रुपयांचा विशेष लाभांश जाहीर केला आहे. डीसीबी बँकडीसीबी बँकेने चौथ्या तिमाहीत १७७ कोटींचा निव्वळ नफा नोंदवला, जो मागील वर्षाच्या तुलनेत १३.७ टक्क्यांनी जास्त आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्नही ९.९ टक्क्यांनी वाढून ५५८ कोटी रुपये झाले. पूनावाला फिनकॉर्पसायरस पूनावाला ग्रुपच्या या एनबीएफसी कंपनीने चौथ्या तिमाहीत 62.3 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. नफ्यात 81.2 टक्के घट झाली. कंपनीच्या मते, ही घसरण एक वेळच्या खर्चामुळे आणि आधीच्या तरतुदींमुळे झाली आहे. मात्र, निव्वळ व्याज उत्पन्न ११.७ टक्क्यांनी वाढून ७०७.९ कोटी रुपये झाले. आयआरईडीएसरकारी मालकीच्या आयआरईडीएने जेन्सोल इंजिनिअरिंगसोबतच्या व्यवहाराचा अंतर्गत आढावा सुरू केला आहे. कंपनीने बनावट कागदपत्रांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या, जेन्सोलचे खाते 'संकट' म्हणून वर्गीकृत आहे. मात्र, ते अद्याप एनपीए म्हणून घोषित केलेले नाही. आरबीएल बँकआरबीएल बँकेचा चौथ्या तिमाहीचा निव्वळ नफा ८० टक्क्यांनी घसरून ६८.७ कोटी रुपये झाला. मात्र, इतर उत्पन्नात वाढ आणि तरतूदीमध्ये घट असूनही, बँकेचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी होता. लॉयड्स मेटललॉयड्स मेटल्सने मार्च २०२५ मध्ये संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर २७ टक्क्यांनी घट होऊन तो २०२ कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीचा महसूलही २३.२ टक्क्यांनी घटून १,१९३ कोटी रुपयांवर आला आहे. EBITDA मध्ये ४३ टक्क्यांची मोठी घट झाली. महिंद्रा हॉलिडेजमहिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडियाचा चौथ्या तिमाहीतील निव्वळ नफा ११.४ टक्क्यांनी घटून ७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूलही २.७ टक्क्यांनी घसरून ७७८.८ कोटी रुपये झाला, जो गेल्या वर्षी ८००.२ कोटी रुपये होता.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.