Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹ १५०० काय ५००० द्या; महायुती सरकारचे मंत्री नेमकं असं का म्हणाले?
Saam TV April 28, 2025 09:45 PM

अभिजित देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

लाडकी बहीण योजनेबाबत अनेक चर्चा सध्या होत आहे. एप्रिलचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या सगळ्यात आता लाडक्या बहिणींना ५००० रुपये दिले तरी आमचे काही म्हणणे नाही, असं वक्तव्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे. लाडक्या बहिणींना ५००० रुपये दिले, तरी आमचे काही म्हणणे नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

नरहरी झिरवाळ नेमकं काय म्हणाले?

लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) १५०० आणि २१०० हे काय आज झालेलं नाही. ५ हजार दिले तरीही आमचं काही म्हणणं आहे. पाणीसारख्या मुद्दयावर काम करण्यास अडचण येते. सुधारल्यावर महिलांना पैसे वाढवून देणार असं सांगितलं आहे. योजना कोणीही बंद करु शकत नाही. उत्पन्न आणि खर्च पाहावा लागतो.विकासकामाबद्दल अडचणी आल्या नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कोणीही बंद करु शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

योजनेबाबत अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधकांनी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आहेत. दरम्यान, यावर आता महायुतीच्या मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. १५००, २१०० काय ५००० रुपये दिले तरी आम्हाला काही नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. नरहरी झिरवाळांच्या या वक्तव्याची लाडक्या बहिणींमध्ये जोरदार सुरु आहे.

एप्रिलचा हप्ता कधी

लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पडलेला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेता हप्ता ३० तारखेपूर्वी येईल, असं आदिती तटकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे हा हप्ता खरंच ३० तारखेपर्यंत येतो की लांबणीवर जाणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.