Mahindra Thar Car : कारनिर्मिती उद्यागोतील अग्रगण्य अशा महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीच्या अनेक आलिशान अशा कार आहेत. या कंपनीच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक कार आहेत. महिंद्रा कंपनीच्या एसयूव्ही कार तर फारच प्रसिद्ध आहेत. या एसयूव्ही कारपैकी महिंद्रा थार (Mahindra Thar) ही कार लोकांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. ही कार खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हे सगळं कसं शक्य आहे, ते जाणून घेऊ या…
महिंद्रा थार ही संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. महिंद्रा थार या कारमध्येही वेगवेगळी मॉडेल्स आहेत. महिंद्रा थारच्या बेस व्हेरियंटची शोरूम किंमत 11.50 लाख रुपये आहे. तर महिंद्रा थारच्या टॉप व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत 17.60 लाख रुपये आहे. तुम्हाला या कारचे AX OPT DIESEL 2WD HT हे बेस व्हेरियंट खरेदी करायचे असेल तर तुम्हाला फक्त दोन लाख रुपये डाऊन पेमेंट देऊन ती खरेदी करता येईल.
महिंद्रा थारच्या बेस व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत ही 11.50 लाख रुपये आहे. तुम्हाला ही कार राजधानी दिल्लीमध्ये खरेदी करायची असेल तर त्यासाठी 1.15 लाख रुपये रजिस्ट्रेशन टॅक्स द्यावा लागेल. सोबतच 54,000 रुपयांचा विमा काढावा लागेल. यासह 11,499 रुपये टीसीएस चार्जेस द्यावे लागतील. हे सर्व चार्जेस मिळून तुम्हाला थारच्या बेसिक व्हेरियंटसाठी एकूण 13.30 लाख रुपये द्यावे लागतील. तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये डाऊनपेमेंट केलं तर उरलेल्या 11.30 लाख रुपयांसाठी बँकेकडून कर्ज घेता येईल.
बँक तुम्हाला 9 टक्क्यांच्या हिशोबाने हे कर्ज देत असेल आणि तुम्ही सात वर्षांच्या मुदतीवर हे कर्ज घेत असाल तर तुम्हाला एकूण 18,181 रुपये ईएमआय येईल. या कारच्या खरेदीवर तुम्हाला एकूण 3.97 लाख रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजेच महिंद्रा थारच्या बेसिक व्हेरियंटसाठी तुम्हाला एकूण सात वर्षांत 17.27 लाख रुपये द्यावे लागतील.