IND vs SA : दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियाचं आव्हान, सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
GH News April 29, 2025 12:07 AM

वूमन्स टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात ट्राय सीरिज खेळत आहे. या ट्राय सीरिजमध्ये टीम इंडियासह यजमान श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा सहभाग आहे. प्रत्येक टीम या ट्राय सीरिजमध्ये प्रत्येकी 4-4 सामने खेळणार आहे. या मालिकेला 27 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात अप्रतिम सुरुवात केली. टीम इंडियाने श्रीलंका वूमन्स क्रिकेट टीमवर मात करत विजयी सलामी दिली.

त्यानंतर आता या मालिकेतील दुसरा सामना हा मंगळवारी 29 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाचा हा या मालिकेतील एकूण आणि सलग दुसरा तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना असणार आहे. टीम इंडियाचा या सामन्यात विजय मिळवून सलग दुसरा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचा विजयी सुरुवात करण्याचा मानस असणार आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ट्राय सीरिजमध्ये लॉरा वोल्वार्ड ही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. लॉराच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका टीम इंडियासमोर कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट बोर्डाचं लक्ष असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असेल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मंगळवारी 29 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.

ट्राय सीरिजसाठी वूमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरविंद, अरविंद, अरविंद, शुक्ल राऊत. उपाध्याय.

ट्राय सीरिजसाठी वूमन्स दक्षिण आफ्रिका टीम : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, ॲनेरी डेर्कसेन, लारा गुडॉल, नादिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर),नॉनकुलुलेको म्लाबा, मसाबता क्लास, अयाबोंगा खाका, काराबो मेसो, मियाने स्मित, नॉन्डुमिसो शांगासे आणि सेश्नी नायडू.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.