जुन्या इमारतींचा पुनर्विकासबाबत मार्गदर्शन कार्याशाळा
esakal April 29, 2025 12:45 AM

जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन कार्याशाळा
‘यूडीसीपीआर’ नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे, त्यामुळे ‘एफएसआय’ कसा व किती वाढला, त्याचा वापर कसा करायचा, व्यवहार्यता अहवाल कशासाठी काढतात, पीएमसी म्हणजे काय आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा नोंदणी आदी सर्व मुद्द्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना पुनर्विकास क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, स्थावर संपदा अभिकर्ते यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

स्थावर संपदा मालमत्तेचे मूल्यांकन प्रशिक्षण
स्थावर संपदा मालमत्तेचे मूल्यांकन (रिअल इस्टेट प्रॉपर्टी व्हॅल्युएशन) करण्याच्या क्षेत्रात यायचा विचार करीत असणाऱ्यांसाठी किंवा या क्षेत्रात काम करीत आहे, परंतु सुयोग्य पद्धत माहीत नाही अशांसाठी उपयुक्त असे प्रशिक्षण ५ मे ते १८ मेदरम्यान होणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण करून मालमत्तेचे मूल्यांकन करणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. प्रशिक्षण ऑनलाइन दोन आठवडे व एक दिवस प्रात्यक्षिक अशा स्वरूपात होणार आहे. स्थापत्य अभियंते, वास्तुविद्या विशारद व विद्यार्थी यांच्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

व्यावसायिक चाट आणि स्नॅक्स कार्यशाळा
चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी, याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ३ व ४ मे रोजी होणार आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कटवडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या व पराठ्याचे प्रकार कसे करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये गोड व हिरवी चटणी, पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दहीवडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅण्डिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

ग्रामस्तरावरील व्यवसाय विकास प्रशिक्षण
शेतमाल व अन्न प्रक्रिया, कुटिरोद्योग, गृहोद्योग, स्थानिक व नैसर्गिक संसाधनांवरील प्रक्रियाआधारित उद्योग इत्यादी विविध प्रकारचे उद्योग व व्यवसाय करण्यासाठी इच्छुक गावातील होतकरू, उद्यमशील युवावर्ग, महिला, शेतकरी यांच्यासाठीचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. गावामध्येच ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्थांच्या माध्यमातून या व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी सकाळ व ॲग्रोवन संलग्न प्रशिक्षण संस्था असलेल्या सिमासेस लर्निंगद्वारे (SIILC) ही प्रशिक्षण सेवा उपलब्ध केली जात आहे. गावामध्ये अशा प्रकारचे व्यवसाय विकास प्रशिक्षण आयोजित करण्याची तयारी असलेल्या ग्रामपंचायती तसेच स्थानिक संस्थांनी सिमासेस लर्निंगकडे संपर्क साधावा.
संपर्क : ८९५६७१२६३१, ९३०७६४९०४७

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.