त्याविरोधात आरोग्य कमेचारी आक्रमक
मनपा आयुक्त कार्यालयात घेराओ घालून आंदोलन करत आहेत
जोपर्यंत पगार होणार नाही,तोपर्यंत उठणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे.
मोठ्या संख्येने नर्सेस व डॉक्टर्स, ब्रदर्स हेही आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Pune News: पुण्यात पुरंदर विमानतळ विरोधात शेतकऱ्याचे आंदोलनपुरदर विमानतळ जमीन देण्यास शेतकऱ्याचा विरोध
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्याचा मोर्चा
पुरंदर तालुक्यातील पारगावसह सात गावाचं विमानतळ करण्यास विरोध
पुणे विमानतळ राज्य सरकारनें अधिसूचना काढली आहे,मात्र शेतकरी जमीन देण्यास विऱोध करत आहेत
Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आणखी 3 जागांचे निकाल हाती- हमाल तोलार गटातून सचिन कल्याणशेट्टी पॅनलचे उमेदवार गफार चांदा विजयी
- विद्यमान संचालक तथा अपक्ष उमेदवार भीमा सीताफळे यांना पराभवाचा झटका
- तर व्यापारी गटातून मुस्ताक चौधरी आणि वैभव बरबडे विजयी
- विविध कार्यकारी सोसायटीत कोण बाजी मारतंय यावर बाजार समितीची सत्ता कोणाकडे जाते हे ठरणार
- आत्तापर्यंत एकूण 18 पैकी 7 जागांचे निकाल हाती आलेत
- यामध्ये 3 जागा सुभाष देशमुख गटाकडे, 1 जागा सचिन कल्याणशेट्टी यांच्या पॅनलला मिळालीय
- तर व्यापारी आणि हमाल तोलार गटातील 3 जागा निकलानंतर भूमिका स्पष्ट करणार
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज नांदेडच्या हदगाव तालुका कडकडीत बंदजम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट सुरू आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांचा बळी घेतला.
या घटनेच्या निषेधार्थ नांदेडच्या हदगाव तालुक्यामध्ये बंद पाळण्यात आला. हादगाव तालुक्यातील हदगाव,तामसा,निवघा ठिकाणी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध करण्यात आला.
दरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देत पाकिस्तानचा ध्वज देखील यावेळी जाळण्यात आला. या बंदमध्ये विविध पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या.
पहलगाम येथील हल्ल्याचा काँग्रेसच्या वतीने चिखली येथे व्यक्त केलाय जाहीर निषेधपहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे त्याचं पार्षभूमीवर बुलढाण्यातील चिखली येथे काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय..
पाकिस्तानचा झेंडा व आतंगवादी याचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला..
याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमेटी जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्या नेतृत्वात असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निदर्शने करीत प्रचंड घोषणाबाजी केली..
जो हिंदुस्थान पे आख उठायेगा उसकी आख निकालेंगे, हातात तलवार घेऊन नवनीत राणांचा पाकिस्तानला इशारापाकिस्तान मुर्दाबाद अशा नवनीत रानांकडून जोरदार घोषणा...
रवी राणांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी नवनीत राणांचा तलवार भेट दिली त्यावेळेस नवनीत रानांनी घोषणा दिल्या..
मुरलीधर मोहोळ यांनी घेतला पुणे विमानतळावर २० रुपयांच्या वडापावचा आस्वादकेंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुणे विमानतळावर सुरू झालेल्या उडान कॅफे मधून स्वतः २० रूपे देऊन वडापाव विकत घेतला. पुणे विमानतळावरून प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने विमानतळावर हे कॅफे सुरू करण्यात आलं आहे. सामान्यांना खिशाला परवडणारे या कॅफे मध्ये चहा १० रुपये तर कॉफी २० रुपयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाट रस्ता वाहतुकीसाठी बंदपुणे खानापूर मार्गे राजगड आणि तोरणा या किल्ल्यांना तसेच राजगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वेल्हेला जोडणारा पाबे घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी ४ मे पर्यंत असणार बंद
पावसाळ्याच्या अगोदर घाटरस्त्याचे उर्वरीत डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असल्यानं रस्ता ठेवण्यात आला बंद
तरी नागरिकांनी नसरापूर मार्गे,कादवे खिंडी मार्गे,किंवा कुसगाव खिंड रोडचा पर्यायी मार्गाचा वापर करावा.... सार्वजनिक बांधकाम विभागाचे आवाहन..
सिंहगड रोड राजाराम ब्रिज ते वडगाव ब्रिज ट्राफिक जामसिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम झालं असतानाही वाहतुकीसाठी उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही.
मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
सकाळी दहा ते अकरा दरम्यान अजूनही ट्राफिक जाम आहे
Pune International Airport: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफीहवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'उडान कॅफे' या उपहारगृह सुरू
या कॅफेमधून विमान प्रवाशांना विमानतळावर स्वस्तात आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होणार आहेत
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या होते होणार उद्घाटन
या कॅफेच्या माध्यमातून प्रवाशांना १० रुपयात पाणी आणि चहा, २० रुपयांत कॉफी, २० रुपयांत समोसा आणि २० रुपयांत मिठाई उपलब्ध होत आहे
Jalna: जालन्यात दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाजालन्यात दिव्यांग बांधवांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा मोर्चा काढला.
आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याने देखील दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रति महिना सहा हजार रुपये मानधन द्याव यासह विविध मागण्यांसाठी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेच्या वतीने जालना शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला आहे.
सोलापूरचा पालकमंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं; दत्ता भरणे यांचा जयकुमार गोरे यांना टोलासोलापूरच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किती चढाओढ होती हे आजही दिसून येते. सोलापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त करत, मी सोलापूरचा पालक मंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं असा टोला क्रिडा मंत्री व वाशिमचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी सध्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला.
मागील वेळी सोलापूरचे पालकमंत्री पद दत्ता भरणे यांच्या कडे होते. पुन्हा सोलापूरचे पालकमंत्री आपणाला मिळेल अशी आशा भरणे यांना होती मात्र भाजपने सोलापूरचे पालकमंत्री स्वतःकडे घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पालकमंत्री पद दिले.
यावरून आता दत्ता भरणे यांनी सोलापूरचे पालकमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त केली.
मी या सोलापूरचा पालकमंत्री असतो तर तुम्हाला मी बोलून सुध्दा दिले नसते. मागील वेळी पालकमंत्री असताना लोकांच्या मनात आजही आठवणी आहेत. मोहिते पाटील विरोधात असतानाही मी कोणताही भेद भाव केला नाही. लोकांची कामं केली.
पालकमंत्र्यांना खूप काही करता येत मी पालक मंत्री असतो तर लोकांनी मला डोक्यावर घेतलं असतं अस म्हणत भरणे यांनी गोरे यांना टोला लगावला.
Latur News : उदगीरमध्ये दोन गटात तुफान हाणामारीलातूरच्या उदगीर तालुक्यातील नागलगाव भीमा तांडा येथे दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे... हाणामारीत दगड गोटे ,आणि लाटा काट्यांचा समावेश असल्याच देखील दिसून आले आहे.. दरम्यान घटनास्थळी पोलीस असतानाही तुफान हाणामारी झाली आहे .. यात 5 ते 6 जन गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.. . हाणामारीचे आणि अद्याप समोर आलेलं नाही.. पोलिसांनी सध्या या तांड्यावर बंदोबस्त दिला आहे...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिल्या 4 जागांचे निकाल हाती- ग्रामपंचायत गटातील 4 जागांची मतमोजणी पूर्ण
- भाजप आमदार सुभाष देशमुख गटाची 4 पैकी 3 जागांवर विजयी
- तर प्रतिस्पर्धी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाट्याला केवळ 1 जागा मिळाली
- आमदार सुभाष देशमुख गटाचे उमेदवार मनिष देशमुख, रामप्पा चिवडशेट्टी आणि अतुल गायकवाड विजयी
- तर सचिन कल्याणशेट्टी गटाचेउमेदवार सुनील कळके यांचा ग्रामपंचायत गटातून विजय
- शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि कल्याणशेट्टी गटाचे उमेदवार गणेश वानकर यांना पराभवाचा धक्का
- 18 पैकी 4 जागांचे निकाल जाहीर झालेत
- अद्याप 14 जागांचे निकाल येणे बाकी
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ नांदगाव कडकडीत बंदजम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भाड़ हल्यात निष्पाप हिंदूंचे प्राण गमावले याच्या निषेधार्थ नाशिकच्या नांदगाव शहरात सकाळ पासूनच कडकडीत बंद पुकारण्यात आला असून त्याला व्यापारी,नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे,बंद मुळे शहरात गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळाला ,दरम्यान दुपारी 4 वाजता सकल हिंदू समाजा तर्फे हुतात्मा स्मारक येथे या घटनेच्या निषेधार्त पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे
पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाट रस्ता वाहतुकीसाठी बंदपुणे खानापूर मार्गे राजगड आणि तोरणा या किल्ल्यांना तसेच राजगड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वेल्हेला जोडणारा पाबे घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी ४ मे पर्यंत असणार बंद
पावसाळ्याच्या अगोदर घाटरस्त्याचे उर्वरीत डांबरीकरणाचे काम करण्यात येणार असल्यानं रस्ता ठेवण्यात आला बंद
जळगावमध्ये ट्रकने कट मारल्याने एसटी बस खड्ड्यात, मोठा अनर्थ टळला!निंभोरेहून जळगावला येणारी एसटी बस आहुजा नगर स्टॉपजवळ ट्रकने कट मारल्यामुळे समांतर रस्त्याच्या खड्ड्यात उतरली. सुदैवाने बस झाडाझुडपांमध्ये अडकली आणि मोठा अनर्थ टळला. बस पलटी होऊन खड्ड्यात पडली असती तर मात्र मोठी दुर्घटना झाली असती. बसमध्ये 40 ते 50 प्रवासी होते, मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून अपघातामुळे प्रवासी व चालक-वाहक घाबरले होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
बदलापूरमध्ये भाजपात खांदेपालटबदलापूरमध्ये भाजपाच्या पक्ष संघटनेत खांदेपालट झाला असून किरण भोईर, रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे भाजपाने तरुणांच्या हाती संघटनेची धुरा सोपवल्याचं पाहायला मिळतंय. या तिघांनाही आमदार किसन कथोरे आणि जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलं.
रंडोलमध्ये आज कडकडीत बंदकश्मीर येथील पहलगामला झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ जळगावच्या एरंडोल येथे आज सकाळपासूनच बंदची हाक देण्यात आली आहे. यामुळे एरंडोल शहर कडकडीत बंद असल्याचे दिसून येत असून सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे.यावेळी पलगाम हल्ल्याचा निषेध समाजबांधवांच्या वतीने करण्यात आला आहे.
Maharashtra News Live Updates: कोरोना काळात आंदोलन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या विरोधातील खटल्याची आज सुनावणी- कोरोना काळात आंदोलन करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्या विरोधातील खटल्याची आज सुनावणी
- निफाडच्या प्रथमवर्ग न्यायालयात होणार सुनावणी
- कांदा निर्यात बंदी विरोधात सदभाऊ खोत यांनी केले होते आंदोलन
- कोरोना काळात आंदोलन केल्याने सदाभाऊ आणि त्याच्या सहकाऱ्यांवर दाखल झाला होता गुन्हा
- कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी करण्यात आला होता गुन्हा दाखल
- या प्रकरणी आज अंतीम निकाल येण्याची शक्यता
विश्वजित कदम यांच्या ज्येष्ठ बहिणीचे निधनस्वर्गीय डॉ पतंगराव कदम यांच्या जेस्ट कन्या आणि
माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या ज्येष्ठ बहिणीचे निधन
कुंडल चे नेते महेंद्र आप्पा लाड याच्या सुविद्य पत्नी भारती महेंद्र लाड याचे दुःखद निधन
पुण्यात भारती हॉस्पिटल मध्ये उपाचारदरम्यान निधन. भारती महेंद्र लाड असे त्यांचे नाव
आज 10 वाजता कुंडलं येथे होणार भारती लाड यांच्यावर अंत्यसंस्का
Maharashtra News Live Updates: विदर्भाला मागे टाकत पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंदरविवार राज्यातील सर्वाधिक तापमान पुणे शहरात!
पुणे शहरातील लोहगाव परिसरात ४२.८ अंश तापमानाची नोंद
पुण्यातील लोहगाव सह इतर परिसरात ४०.६ अंश तापमानाची नोंद
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा चटका कायम
अकोला, वाशिम मध्ये काल पारा ४२.४ अंशावर
वर्धा, यवतमाळ नागपूर मध्ये सुद्धा उन्हाळा कायम असून ३९ अंश तापमानाची नोंद
मराठवाड्यात परभणी मध्ये ४२.४, बीड मध्ये ४१.९, धाराशिव मध्ये ४१.८ अंश तापमान
मध्य महाराष्ट्राचे चित्र पाहता मालेगाव मध्ये ४२.४ अंश, जळगाव, ४२.३, सोलापूर ४० तापमानाची नोंद
Maharashtra News Live Updates: विदर्भात आज मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता- ढगाळ वातावरणामुळे विदर्भातील पारा घसरला बहुतांश जिल्ह्यातील पारा 40 शीच्या आत, मागील काही दिवसांपासून पासून पार 42 वर असल्याचं पाहायला मिळालं...
- नागपूरसह, वर्धा, गोंदिया, भंडारा, अमरावती, वाशीम, यवतमाळ भागात तशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता...
- 7 जिल्ह्यात पावसाचा येल्लो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा...
Pune : गर्दी नियंत्रणासाठी पुणे रेल्वे स्थानकावर तयार करण्यात येणार होल्डिंग झोनप्रवासी संख्या वाढल्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता हा होल्डिंग् झोन तयार करण्यात येणार
पुणे रेल्वे स्थानकावरील पलट क्रमांक एकच्या शेजारी व्हीआयपी गेट शेजारी हा झोन उभारण्यात येणार
या ठिकाणी प्रवाशांसाठी पाणी आणि बसण्याची सोय करण्यात येणार
उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे स्थानकावर बाहेर जाणारे प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे प्रशासनाचा निर्णय
Pune News : उन्हाळ्याच्या सुट्ट्या अन् बंद घरांवर चोरांचा डोळाफिरायला जात असाल तर दक्षता बाळगा, एप्रिल आणि मे महिन्यात चोरटे सक्रिय
गेल्या वर्षी आठ महिन्यात शहरात 335 चोऱ्या झाल्याची नोंद
मे महिन्यात बहुतांश अनेकांना सुट्टी असतात त्यामुळे नागरिक याचा फायदा घेत फिरायला जातात
हीच संधी साधून चोरटे देखील सक्रिय झाल्याचे दरवर्षी या महिन्यातील घरफोड्यांच्या आकडेवारीवरून दिसून आलं आहे
पुणे शहरात घरपोळ्यांचे प्रमाण कमी असले तरी गेल्या वर्षी आठ महिन्यांमध्ये शहरात 335 चोऱ्या झाल्याची नोंद
फिरायला जाताना नागरिकांनी त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम असं अन्य किमती वस्तू बँकेच्या लॉकरमध्ये ठेवाव्यात
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनरचा अपघातमुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर लोणावळा खंडाळा दरम्यान असलेल्या राज हॉटेल समोर रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला. कंटेनरने रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबाला जोरदार धडक 'देत समोर जाणारी कार व दुचाकी यांना देखील धडक देऊन कंटेनर पलटी झाला. या अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहे.. मागील आठवड्यात देखील खंडाळा बॅटरी या ठिकाणी एका अवजड वाहनाने समोर जाणाऱ्या कारला धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी सहा ते रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना प्रवेश बंद असताना देखील मोठचा प्रमाणात अवजड वाहने शहरातून जात असल्यामुळे दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे.
उल्हासनगरात ओव्हरलोड ट्रकला भीषण आगउल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील पंजाबी कॉलनी अयप्पा मंदिर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रान्सपोर्ट ट्रकने पेट घेतल्याची घटना रविवारी रात्री घडली. या आगीत ट्रकमधील माल जळून खाक झाला, तर इमारतीच्या बाल्कनीमध्ये आगीच्या झळा पोहोचल्यानं मोठं नुकसान झालं.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला होणार सुरुवात- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीच्या 18 जागेच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून होणार सुरुवात..
- भाजप आमदार सुभाष देशमुख आणि भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे राज्याचे लक्ष..
- सोलापूर बाजार समितीच्या 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात, काल 96.24% मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क..
- सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला..
- आमदार देशमुख यांचं श्री सिद्धेश्वर परिवर्तन पॅनल आणि आमदार कल्याणशेट्टी यांचं श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल मधून कोण मारणार बाजी याकडे राज्याचे लक्ष..
- आमदार सुभाष देशमुख यांना भाजप आमदार विजयकुमार देशमुख काँग्रेस माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांचा पाठिंबा तर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना भाजप आमदार देवेंद्र कोठे, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या यांच्या पॅनलची लागणार कसोटी...
पाण्याअभावी प्रकल्पातील माशांचा तडफडून मृत्यूवाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यातच अनेक लहान मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठला आहे, पाणीटंचाईच्या समस्या वाढली आहे. तर त्यामुळं अनेक जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना प्रकल्पातील मासे सुद्धा पाण्याअभावी तडफडून मृत्यूमुखी पडत असल्याचा प्रकार मालेगाव तालुक्यातील मोठा प्रकल्प असलेल्या कोल्ही प्रकल्पात समोर आलाय, याच प्रकल्पाच्या काठावर मोठ्या प्रमाणात माशांचा खच पडलाय.
पाणीटंचाईवर आढावा बैठकीत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देशरायगड जिल्ह्यात ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल, त्या ठिकाणी आवश्यक तपासणी करून 24 तासांच्या आत टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, टंचाईग्रस्त गावांत नागरिकांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पाणीटंचाईवर आढावा बैठकीत दिले आहेत. रायगड जिल्ह्यात सध्या 106 वाड्या आणि 21 गावांना 25 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच 17 विहिरी खोल करणे व गाळ काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
दिवा सावंत वाडी गाडीला पेण स्थानकात थांबा पूर्ववत करा; पेण प्रवासी संघाची खासदारांकडे मागणीदिवा सावंत वाडी पसेंजर गाडीला पेण रेल्वे स्थानकात थांबा पूर्ववत करावा अशी मागणी पेण प्रवासी संघाने केली आहे. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धैर्यशील पाटील यांची भेट घेतली आणि रेल्वे बोर्डाकडे केलेल्या पत्र व्यवहाराची चर्चा केली. 30 एप्रिल रोजी मध्य रेल्वे व मुंबई मंडळ यांची बैठक पेण येथे होणार असून या बैठकीत निर्णय घेऊन 1 मे पासून पेण स्थानकात गाडी थांबेल अशी व्यवस्था करावी असा आग्रह धरण्यात आला आहे.