Pune: उंड्रीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढली; नव्या शाखेचे जल्लोषात उद्घाटन
esakal April 29, 2025 06:45 AM

Pune: उंड्री परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. पंजाब नॅशनल बँकजवळील उंड्री चौक येथे पार पडलेल्या या सोहळ्याला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन शाखाध्यक्ष श्री. शुभम प्रितम टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, शहर संघटक गणेश नाईकवाडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष महेश भोईबार, उपशाखाध्यक्ष वैभव शेट्टी आणि सौरभ अस्वले, शाखा संघटक वेदांत जाधव, सरचिटणीस श्रेयस टिंगरे आणि सचिव आदित्य जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Maharashtra Navnirman Sena

उद्घाटन प्रसंगी शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले, "शाखा ही संघटनेचा खरा आधारस्तंभ आहे. शुभम टिंगरे यांच्या नेतृत्वाखाली उंड्री परिसरात मनसे अधिक बळकट होईल, याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून आम्ही संघटना वाढवत राहू."

यावेळी शाखाध्यक्ष शुभम टिंगरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "माझे मुख्य ध्येय म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचा प्रसार करणे, उंड्री परिसरातील स्थानिक समस्यांवर काम करणे आणि संघटनेचा विस्तार करणे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्यरत राहीन."

कार्यकर्त्यांची उपस्थिती

कार्यक्रमात नितीन डप्पडवाड, यश फड, मोजेश गुढेकर, राहुल बत्तीशे, ऋषभ मंडल, ओम आल्हाट, विशाल पाटील, अनुज पिसे, वेंकटेश फड, अनिकेत भुजबळ, शुभम वाघमारे, सुनिल होणमाने, सोहम बावस्कर, सुरज खरात, सागर पवार, आशिष म्हस्के, गणेश अडसूळ, नितीन भालेराव, बाबासाहेब अस्वले, आकाश पवार यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली.

उंड्री भागात मनसेचा झेंडा फडकणार

उद्घाटनानंतर पदाधिकाऱ्यांनी येत्या काळात शाखेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उंड्री परिसरात नागरी सुविधा, वाहतूक समस्या, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करून लोकाभिमुख उपक्रम राबविण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचा समारोप करताना सर्व कार्यकर्त्यांनी उंड्री परिसरात झेंडा अभिमानाने फडकवण्याची ग्वाही दिली. हा उद्घाटन सोहळा हा केवळ एका शाखेच्या प्रारंभाचा नाही, तर उंड्री परिसरात मनसेच्या कार्याचा नव्याने शुभारंभ असल्याचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.