Latest Marathi News Updates : 'पहलगाम घटनेबाबत केंद्राने सखोल चौकशी करावी'; संभाजीराजे यांची मागणी
esakal April 29, 2025 04:45 PM
Sambhajiraje Chhatrapati : 'पहलगाम घटनेबाबत केंद्राने सखोल चौकशी करावी'; संभाजीराजे यांची मागणी

कोल्हापूर : ‘आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात सैन्यदल, पोलिस, सीआरपीएफ जवान यांच्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. मात्र, त्यांनी प्रथमच पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. याची खोलवर चौकशी करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी केली. ते ‘केडीसीए’ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Bandra Showroom Fire : वांद्रेतील शोरूमला आग, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल

मुंबईतील वांद्रे येथील एका शोरूममध्ये आग लागली आणि आता संपूर्ण मॉलला आगीने वेढले आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Kolhapur Police : टेंबलाई परिसरातील हद्दपार गुंडाला अटक

कोल्हापूर : टेंबलाई रेल्वे फाटक येथील वर्षासाठी हद्दपार असलेल्या गुंडाला शहरात फिरताना पोलिसांनी अटक केली. रविराज ऊर्फ राजा महेश कसबेकर (वय २७, रा. टेंबलाई रेल्वेफाटक नं. २, झोपडपट्टी जवळ, टाकाळा) असे त्याचे नाव आहे. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली. कसबेकरला करवीर प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, तरीही तो शहरात फिरताना दिसून आला.

Tirupati Accident : तिरुपतीत भीषण अपघात; बंगळूरचे पाच ठार, दोन जण जखमी

बंगळूर : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात बंगळूरमधील पाच जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. कानिपाकम जवळील थोटापल्लीजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या मोटार चालकाचे नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिरुपतीहून बंगळूरला परतणाऱ्या मोटारीची ट्रकला धडक झाली. यात मोटार पूर्णपणे चिरडली गेली.

Nagpur News : दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

नागपूर जिल्ह्याच्या दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले. चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या झटापटीत या वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. 18 ते 20 महिन्याचा हा वाघ आहे.

Pakistan YouTube Channel : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर पाकिस्तानच्या यूट्यूब चॅनेलवर बंदी

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे, त्यात जिओ न्यूज, डॉन, रफ्तार, बोल न्यूज, एआरवाय न्यूज, समा टीव्ही, सुनो न्यूज यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारशीनंतर या चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे.

Jalna News : जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा जप्त; तीन संशयित आरोपी जेरबंद

जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. एका चारचाकी वाहनातून 85 किलो गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले. विजय गाडे, अमोल चांदणे आणि बाबासाहेब मुंजवार अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tahawwur Rana : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणाच्या कोठडीत वाढ

नवी दिल्ली : मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम बारा दिवसांनी वाढविण्यात आला आहे. अमेरिकेहून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या राणा याच्या कोठडीची मुदत संपल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्याला आज पतियाळा हाऊस न्यायालयासमोर सादर केले होते. राणा हा चौकशीत सहकार्य करीत नसल्यामुळे त्याच्या कोठडीत वाढ केली जावी अशी विनंती ‘एनआयए’कडून करण्यात आली होती. न्यायालयाने त्यावर राणा याची कोठडी वाढविली.

Bandra Croma Showroom : वांद्र्यात क्रोमा शोरुमला आग, कर्मचाऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न

वांद्र्यात क्रोमा शोरुमला आग लागल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. सध्या ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Shiv Jayanti : राज्यभरात आज शिवजयंती सोहळा; ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन

Latest Marathi Live Updates 29 April 2025 : पाकिस्तानी सैन्याने सलग चौथ्या दिवशी सीमेवर गोळीबार करत शस्त्रसंधीचा भंग केला. शत्रूसैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा आणि पूँच जिल्ह्यांत गोळीबार केला. या गोळीबाराला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी भर घालायला सुरुवात केली आहे. आता नौदलासाठी राफेल-एम ही लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. फ्रान्ससोबत त्यासाठी ६३ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तहव्वूर राणा याचा कोठडीतील मुक्काम बारा दिवसांनी वाढविण्यात आला आहे. आज राज्यभरात ठिकठिकाणी शिवजन्मकाळ सोहळ्याचे आयोजन केले आहे. दहशतवादी हल्ल्ल्यानंतर चुकीची, दिशाभूल करणारी आणि धार्मिकदृष्ट्या संवेदनशील माहिती प्रसारित करत असलेल्या १६ यूट्यूब चॅनेलवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. ज्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.