Pahalgam Terror Attack हल्लेखोर हाशिम मूसा निघाला SSG कमांडो, काय आहे पाकिस्तानची ही SSG फोर्स?
GH News April 29, 2025 06:09 PM

पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या चार दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यात एक दहशतवादी हाशिम मूसा उर्फ सुलेमानबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हाशिम मूसा पाकिस्तानी आर्मीची स्पेशल फोर्स SSG चा कमांडो होता. पाकिस्तानची ही SSG कमांडो फोर्स काय आहे? कशी काम करते? त्या बद्दल जाणून घ्या. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धासारखी स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. भारत-पाकिस्तानमध्ये कधीही युद्ध भडकू शकतं अशी स्थिती आहे. यामध्ये मोठ नुकसान होईल. पण पाकिस्तानला धडा मिळणं खूप गरजेच आहे.

SSG ही पाकिस्तानची खतरनाक कमांडो फोर्स मानली जाते. एसएसजी कमांडो फोर्सच पूर्ण नाव स्पेशल सर्विस ग्रुप आहे. दहशतवादी हल्ला, व्हीआयपी सुरक्षा आणि हायजॅक सारख्या स्थितीचा सामना करण्यासाठी ही कमांडो फोर्स बनवण्यात आली आहे. एसएसजीची कमांडो ट्रेनिंग खूप कठीण मानली जाते. बातम्यांनुसार, या कमांडोजना ट्रेन करण्यासाठी अमेरिकन नौदलाच्या सील कमांडोजकडे पाठवलं जातं. एसएसजी कमांडो डायरेक्ट एक्शन, परदेशी आंतरिक सुरक्षा, अपरंपरागत युद्ध मिशन, दहशतवाद विरोधी अभियान सारख्या मिशन्समध्ये सहभागी होतात.

कोण आहे मूसा?

गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, हाशिम मूसा दहशतवादी बनण्याआधी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो होता. सूत्रांच्या माहितीनुसार, हाशिम मूसाचा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने मिळून मूसाने पहलगाम दहशतवादी हल्ला प्रत्यक्षात आणला. हाशिम मूसाला लश्कर-ए-तैयबाने प्रशिक्षण देऊन कश्मीरला पाठवलं होतं. मूसाने इथे येऊन तीन स्थानिक दहशतवाद्यांच्या मदतीने संपूर्ण घटना प्रत्यक्षात आणली अशी माहिती सूत्रांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.