राजस्थान रॉयल्सचा सर्वात युवा आणि 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला. वैभवने 28 एप्रिलला आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध शतकी खेळी केली. वैभवने 35 चेंडूत त्याच्या कारकीर्दीतील पहिलंवहिलं आणि विक्रम शतक झळकावल. वैभवने यासह टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान आणि शतक करणारा सर्वात युवा फलंदाज होण्याचा विक्रम केला. तसेच वैभव आयपीएलमध्ये वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याचा बहुमानही आपल्या नावे केल.
वैभवची या ऐतिहासिक आणि विक्रमी खेळीनंतर सोशल मीडियावर हवा पाहायला मिळत आहे. वैभवच्या शतकाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, यासारख्या अनेक आजी माजी दिग्गज खेळाडूंनी वैभवच्या या खेळीचं कौतुक केलं.
राजस्थान रॉयल्सने वैभवला मेगा ऑक्शन 2025 मधून 1 कोटी 10 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं. वैभव तेव्हा अवघ्या 13 वर्षांचा होता. वैभवचा हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहे. वैभवने या हंगामात आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. वैभवला प्रत्येक सामन्यासाठी साडे सात लाख रुपये मिळणार आहेत. वैभवने अशाप्रकारे आतापर्यंत 22 लाख 50 हजार रुपये कमावले आहेत. तसेच वैभवने गुजरात विरूद्धच्या शतकानंतर अनेक पुरस्कारांच्या माध्यमातूनही कमाई केली आहे. वैभवच्या कमाईचा आकडा हा या मोसमाच्या अखेरपर्यंत 2 कोटीपर्यंत जाऊ शकतो.
वैभवने गुजरात विरुद्ध ज्याप्रकारे आणि ताकदीने बॅटिंग केली आणि फटके लगावले, त्यावरुन पुन्हा एकदा तो 14 वर्षांचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वैभव 14 वर्षांचा नाहीच, त्याने त्याचं वय लपवलंय, असा आरोप याआधी अनेकदा करण्यात आला आहे. वैभवने याआधीच सोशल मीडियावरुन होणाऱ्या आरोपांवरुन स्पष्टकीरण दिलंय. तसेच वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनीही काही महिन्यांआधीच याबाबत प्रतिक्रिया दिली.
“वयाबाबत अनेक जण म्हणाले होते की हा फार मोठा आहे. माझं वय खरंच तितकंच आहे, 27-03-2011 आहे. जे सर्व दिसतंय तेच खरं आहे”, वैभवने अशी प्रतिक्रिया देत त्याची जन्मतारीख सांगितली. वैभवने स्पोर्ट्स तकसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली होती.
“वैभव साडे आठ वर्षांचा असताना त्याची बीसीसीआकडून बोन टेस्ट करण्यात आली. वैभवने अंडर 19 टीम इंडियासाठी डेब्यू केलंय.आम्हाला वयाबाबत कोणतीच भीती नाही. वैभव गरज पडल्यास पुन्हा टेस्ट देईल”, असं स्पष्टीकरण वैभवचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी काही महिन्यांपूर्वी वयाचा वाद उद्भवल्यानंतर दिली होती.