DC vs KKR : दिल्ली कॅपिट्ल्समोर 205 धावांचं आव्हान, कोलकाता विजयी ट्रॅकवर परतणार?
GH News April 30, 2025 12:07 AM

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 मधील 48 व्या सामन्यात होम टीम दिल्ली कॅपिट्ल्सला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं आहे. कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. केकेआरसाठी 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र दिल्लीच्या गोलंदाजांसमोर केकेआरच्या एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही. मात्र त्यानंतरही केकेआरने 200 पार मजल मारण्यात यश मिळवलं. केकेआरसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा या ‘करो या मरो’ असा सामना आहे. त्यामुळे केकेआर हा सामना जिंकून स्पर्धेतील आव्हान कायम ठेवणार की दिल्ली कॅपिट्ल्स प्लेऑफच्या आणखी जवळ येऊन पोहचणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.