Pakistan: सीमा न ओलांडताही 85,38,98,45,00,000 रुपयांचा भारतीय माल पाकिस्तानात पोहचला; कसा झाला छुपा व्यापार
esakal April 30, 2025 08:45 AM

India Pakistan Trade: 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव शिगेला पोहोचला. भारताने पाकिस्तानवर आयात शुल्क 200 टक्क्यांपर्यंत वाढवले आणि पाकिस्तानचा Most Favoured Nation (MFN) "सर्वात प्रिय राष्ट्र" दर्जा काढून घेतला.

तरीही, दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सचा भारतीय माल पाकिस्तानमध्ये पोहोचतो, तोही आंतरराष्ट्रीय सीमारेषा न ओलांडता. जॉर्जिया टेक रिसर्च इन्स्टिट्यूट (GTRI) च्या माहितीनुसार, यासाठी दुबई, सिंगापूर आणि कोलंबो यांसारख्या जागतिक बंदरांमार्गे 'तिसऱ्या देशात ट्रान्सशिपमेंट' ही पद्धत वापरली जाते.

GTRI संस्थेचे संस्थापक श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतीय माल प्रथम दुबई, सिंगापूर किंवा कोलंबो येथे पाठवला जातो आणि तेथील बॉन्डेड वेअरहाऊसमध्ये साठवला जातो. तेथे, या वस्तूंवरील लेबल आणि कागदपत्रं बदलली जातात, आणि मालाचा मूळ देश बदलून (उदा. भारताऐवजी युएई दाखवून) पाकिस्तानमध्ये पुन्हा निर्यात केली जाते.

उदाहरण म्हणून GTRI सांगते की, भारतातून दुबईला अंदाजे 1 लाख डॉलर्सचा ऑटो पार्ट्सचा माल पाठवला गेला. दुबईत लेबल बदलल्यानंतर तोच माल 1.3 लाख डॉलर्सला पाकिस्तानमध्ये विकला गेला.

2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीदरम्यान भारताने पाकिस्तानमध्ये सुमारे 447.65 दशलक्ष डॉलर्सचा माल निर्यात केला आणि मोठा फायदा मिळवला. याच काळात भारताने पाकिस्तानकडून फक्त 42 दशलक्ष डॉलर्सचा माल आयात केला. मात्र GTRI च्या अंदाजानुसार, विविध मार्गांनी पाकिस्तानमध्ये पोहोचणाऱ्या भारतीय वस्तूंची एकूण किंमत 10 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.