लातूर जिल्ह्यातल्या वाडी तांड्यांना भीषण पाणीटंचाईची जाणवत आहे... लातूरच्या जळकोट तालुक्यातील अग्रवाल तांड्यावर घागर भर पाण्यासाठी नागरिकांना जीवघेणी कसरत करून पाणी काढावे लागत आहे.. खोल विहिरीत उतरून तळाला गेलेले पाणी जीव धोक्यात घालून तरुणांना काढावे लागत आहे.. जळकोट तालुक्यातील गुत्ती ग्रामपंचायत अंतर्गत असलेला अग्रवाल तांडा हे मागच्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी वन वन फिरत आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने यांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज- न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित महिला आरोपी मनीषा माने यांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज
- संशयित महिला आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जामीनासाठी सादर करण्यात आला अर्ज
- मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
- त्यामुळे बहुचर्चित असलेल्या या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा माने यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष
Sangli News: सांगलीत बेकायदेशीरपणे गाईच्या वासरांची तस्करी...मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीर पणे गाईच्या वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गो रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला आहे.. गाडीचा पाठलाग करत असताना गाडी पलटी झाली. यावेळी तस्करी साठी 33 वासरे चारचाकी गाडीत आढळली आहेत. यातील पाच वासरे मृत्युमुखी पडली आहेत. तर अन्य वासरांची सुटका करण्यात आली.या गाडीचा चालक पळून गेला आहे.
वेण्णा लेक येथील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा इशारा... महा पर्यटन महोत्सवा दिवशी करणार आंदोलनमहाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरातील २८ स्टॉल धारकांनी २ मे ला म्हणजेच महा पर्यटन उत्सवा दिवशी जल समाधीचा प्रशासनाला इशारा दिला आहे.हे स्टॉल धारक अनेक वर्षांपासून वेण्णा लेक परिसरात उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसाय करत होते.मात्र २०२३ मध्ये हे स्टॉल वन विभागाद्वारे काढून टाकण्यात आले.यामुळे गेल्या २ वर्षापासून या २८ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
शरद पवार गटाला मोठा धक्का! माजी मंत्री डॉ सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणारजळगावच्या पारोळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार
लवकरच मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत डॉ. सतीश पाटील कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती
पारोळा -एरंडोल मतदारसंघातून डॉ.सतीश पाटील यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली यात ते पराभूत झाले आहेत
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
डॉ. सतीश पाटील यांची आज त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक असून यात प्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे..
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आंबा स्वस्त! पुण्यात खरेदीसाठी गर्दीसाडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी कोकणातून पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांत हापूसची मोठी आवक सुरू झालीय. आवक वाढल्याने दरांत घट झाली असून, तयार हापूस बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. प्रतवारीनुसार हापूसचा दर ५०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. हंगामातील दुसऱ्या टप्यात आंब्याची आवक वाढली असून बाजारात तयार आणि कच्चा आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.
पुणे विमानतळाजवळ बिबट्याचा वावर, बिबट्या थेट रन वे वरकाल रात्री अंदाजे ९.३० वाजता पुण्यातील लोहेगाव परिसरात, पुणे विमानतळाजवळ बिबट्या फिरताना नागरिकांनी पाहिला. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो काही लोकांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. विमानतळ परिसरात गरज नसल्यास फिरू नये, असे आवाहन करण्यात आलं होतं. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा पुणे विमानतळाच्या धाव पट्टीवर सुद्धा वावर होता.
देशातील पहिलं आधारकार्ड धारक आदिवासी महिलेला तब्बल नऊ महिन्यांनी मिळाला भारतीय बहीण योजनेचा लाभदेशातील पहिला आधार कार्ड देऊन गौरवण्यात आलेल्या आदिवासी महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात राहणाऱ्या आदिवासी महिलेला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हस्ते पहिलं आधार कार्ड देऊन आधार कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र त्याच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात फिरफिर करावी लागली आहे
पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासलेला छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल जिल्हा कारागृहात हलवले.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये असून त्याच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेले बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक न्यायालयाने कोठडी मध्ये असलेले रणजीत कासले याला सुरक्षेच्या कारणावरून बीड जिल्हा कारागृहामध्ये छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे
लातूर मनपाच्या इतिहासात यंदा सर्वाधिक करवसूली मनपाच्या तिजोरीत 80 कोटीचा भरणालातूर महानगरपालिकेने यंदा सर्वाधिक कर वसुली केली आहे.. मनपाच्या तिजोरीत यंदा तब्बल 80 कोटीची जोरदार वसुली केली आहे..गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमालीची कर वसुली झाल्याने महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये देखील वाढ होणार आहे.
नाशिकच्या मालेगाव मध्ये तापमानाचा पारा आज पुन्हा 43 अंशाच्या पुढे गेला आहेरोज तापमान कमी जास्त होत असले तरी ते सातत्याने 42 अंशाच्या पुढे जात असताना आज तापमान पुन्हा 43.2 अंशावर गेले,सकाळ पासूनच तापमानाचा पारा हळू हळू वाढू लागत असल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे
जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा जप्त, तीन संशयित आरोपी जेरबंदजालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय. एका चार चाकी वाहनातून 85 किलो गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केल आहे.
Nashik News: नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ८ गावं, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठानाशिकच्या नांदगाव तालुक्यात ८ गावं, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा
नाशिकच्या नांदगाव तालूक्यात पाणी टंचाई झळा बसू लागल्या
तालूक्यातील आठ गावे व वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरु करण्यात आले आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक ७७ टँकर सुरु होते नव्याने पुन्हा अकरा गावे व वाड्यावस्त्यांसाठीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.
मागील वर्षी चांगला पासून झाल्याने यंदा एप्रिल च्या दुस-या आठवड्या पासून पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे.
Amravati News: अमरावतीत रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत सर्वाधिक वीजपुरवठा खंडितअमरावती -
अमरावतीत रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत सर्वाधिक वीजपुरवठा खंडित
दरदिवशी 300 तक्रारी
विजेच्या वाढत्या मागणीमुळे महावितरणच्या यंत्रणेवर वाढला ताण
कमी अधिक दाबाने कुलर किंवा एसी उपकरणे चालवणे झाले अवघड
तापमानात वाढ झाल्याने कुलर आणि एसी सर्वाधिक लावले जात आहे त्यामुळे विजेच्या दाबावर त्याचा परिणाम होत आहे