भारत सरकारने उचलले पाऊल : शेजारी देशात खळबळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानसोबत तणावपूर्ण संबंधांनंतरही भारत दीर्घकाळापासून पाकिस्तानला जीवनरक्षक औषधे आणि फार्म्यास्युटिकल उत्पादनांचा पुरवठा करत राहिला आहे. परंतु आता भारत यासंबंधी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. भारत सरकारने फार्मास्युटिकल एक्स्प्रोर्ट प्रमोशन कौन्सिलला पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या सर्व औषधे आणि फार्मा उत्पादनांची विस्तृत यादी त्वरित तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. भारत सरकारच्या या पावलामुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे, कारण पाकिस्तान स्वत:च्या औषध आवश्यकतांचा जवळपास 40 टक्के भारताच्या मदतीने पूर्ण करतो.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात ठोस पावले उचलली असून यात अटारी चेकपोस्ट बंद करणे आणि पाकिस्तानी दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे सामील आहे. तसेच भारताने व्यापारी संबंधांवरही पुनर्विचार सुरू केला, याच्या अंतर्गत औषधांच्या निर्यातीच्या समीक्षेचा निर्णय घेण्यात आला. आता फार्मास्युटिकल्स विभागोन मागील दोन वर्षाच्या निर्यात आकडेवारीवर एक विस्तृत अहवाल मागविला आहे, कारण भारत द्विपक्षीय व्यापारावर पूर्ण बंदी घालण्याच्या शक्यतेवर विचार करत आहे. हे पाऊल पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद करण्याच्या घोषणेनंतर उचलण्यात आले आहे.
पाकिस्तानची भारतावरील निर्भरता
पाकिस्तान स्वत:च्या औषधांच्या पुरवठ्यासाठी भारतावर बऱ्याचअंशी निर्भर आहे. ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तानुसार भारतातून येणारी औषधे आणि कच्चा माल पाकिस्तानच्या 50-60 टक्के औषध गरजांना पूर्ण करतात. यात खालील गोष्टील सामील आहेत..
कॅन्सर विरोधी औषधे : कॅन्सरवरील उपचारासाठी आवश्यक औषधे.
व्हॅक्सिन : अँटी-रेबीज लस आणि अँटी-स्नेक वेनम.
बायोलॉजिकल्स : मोनोक्लोनकल अँटीबॉडी आणि अन्य जैविक उत्पादने.
औषधांचा कच्चा माल (एपीआय) : औषधांच्या निर्मितीसाठी आवश्यक रासायनिक घटक.
परंतु भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांची अचूक यादी सार्वजनिक स्वरुपात उपलब्ध नाही, पण यात अनेक जीवनरक्षक औषधांचा समावेश असून त्यांचा पुरवठा न झाल्यास पाकिस्तानची आरोग्य यंत्रणा कोलमडू शकते असे तज्ञांचे मानणे आहे.
भारत सरकारचे पाऊल
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या सर्व व्यापारी घडामोडींची समीक्षा सुरू केली आहे. फार्माएक्सिल वाणिज्य मंत्रालयाच्या अधीन कार्य करते. सरकारने फार्माएक्सिलला पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या सर्व औषधे आणि फार्मा उत्पादनांची यादी लवकरात लवकर तयार करण्याचा निर्देश दिला आहे. भारताच्या औषधांवर पाकिस्तानची निर्भरता किती आहे आणि या औषधांची निर्यात मर्यादित किंवा बंद केली जाऊ शकते का हे जाणून घेण्याचा यामागे उद्देश आहे.
पाकिस्तानात खळबळ
भारताच्या या पावलामुळे पाकिस्तानात चिंता वाढली आहे. ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ पाकिस्तानने भारताकडून औषधांच्या निर्यातीवर बंदीची कुठलीही औपचारिक सूचना अद्याप प्राप्त झाली नसली तरीही आपत्कालीन योजना तयार केल्या जात असल्याचे सागितले आहे. पाकिस्तान आता चीन, रशिया आणि युरोपीय देशांकडून पर्यायी स्रोतांचा शोध घेत आहे. परंतु या देशांमधून औषधांचा पुरवठा सुरू करण्यास वेळ आणि खर्च दोन्हीही अधिक लागणार आहे.
पाकिस्तानची पर्यायी रणनीति
पाकिस्तानने भारतासोबत व्यापार स्थगित झाल्यावर औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन उपाय सुरू केले आहेत.
चीन अन् रशियाशी संपर्क : औषधे आणि कच्च्या मालासाठी नव्या पुरवठादारांचा शोध
स्थानिक उत्पादने वाढविण्याचा प्रयत्न : पाकिस्तानचा फार्मा उद्योक भारताचे स्थान घेऊ शकेल इतका सक्षम नाही.
युरोपीय देशांशी चर्चा : विशेष स्वरुपात बायोलॉजिकल्स आणि व्हॅक्सिनसाठी.