उन्हाळ्याच्या दिवसात योग्य प्रमाणात पाणी न प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि आपले तोंड कोरडे पडते. बऱ्याचदा लोकांना खूप तहान लागते आणि ते वारंवार पाणी पितात. पण तरीही त्यांचे तोंड कोरडे पडते. या गोंष्टींकडे लोकं अनेकदा दुर्लक्ष करतात आणि त्यांना वाटते की ही एक सामान्य समस्या आहे. मात्र वारंवार तोंड कोरडे पडणे ही एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे असू शकतात, म्हणूनच आपण या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. कारण या लक्षणांनी आपल्या शरीरात कोणते आजार उद्भवू शकतात, हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. तर आजच्या या लेखात आपण वारंवार तोंड कोरडे पडल्याने कोणते गंभीर आजार होऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.
तुम्हाला सुद्धा वारंवार तहान लागत असेल आणि तोंड कोरडे पडत असेल तर हे मधुमेह आजाराचे लक्षण असू शकतात. कारण मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिनचा अयोग्य वापर झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. आजकाल या आजाराने ग्रस्त लोकं आपल्याला प्रत्येक घरात आढळतात.
हायपोथायरॉईडीझम किंवा हायपोथायरॉईडीझम सारख्या थायरॉईड विकारांमुळे पाणी पिऊनही तोंड वारंवार कोरडे पडू शकते. कारण आपल्या शरीरातील चयापचय नियंत्रित करण्यात थायरॉईड ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावते.
किडनीचा आजार म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज किंवा क्रॉनिक किडनी फेल्युअर म्हणजेच किडनीचे कार्य हळूहळू कमी होणे. ज्या लोकांचे तोंड कोरडे पडते आणि सतत तहान लागते, त्यांचबरोबर थकवा, सूज, लघवीमध्ये बदल आणि वजन कमी होणे, हे या आजाराची लक्षणे आहेत. कारण किडनीचा आजार असल्यास तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकू शकत नाहीत. यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
एचआयव्ही/एड्स हा एक आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे तोंड कोरडे पडण्याची समस्या उद्भवू शकते. या आजारामुळे शरीराला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. त्यामुळे तुमचे तोंड वारंवार कोरडे पडत असेल तर वेळीच खबरदारी घेऊन योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)