W,W,W, Yuzvendra Chahal ची Hat-trick, चेन्नई विरुद्ध कारनामा, पाहा व्हीडिओ
GH News May 01, 2025 01:06 AM

पंजाब किंग्जचा स्टार लेग-स्पिनर युजवेंद्र चहल याने आयपीएल 2025 मधील 49 व्या सामन्यात इतिहास घडवला आहे. चहलने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात एमए चिदंबरम स्टेडियममध्ये शानदार बॉलिंग करत हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे. चहलने 19 व्या ओव्हरमधील शेवटच्या अर्थात सहाव्या बॉलवर नूर अहमद याला आऊट केलं. यूझवेंद्र चहल यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमात हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. तसेच चहलच्या कारकीर्दीतील ही दुसरी तर चेन्नई सुपर किंग्स विरुद्धची पहिली हॅटट्रिक हॅटट्रिक ठरली. चहलने याआधी आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याच्या कारकीर्दीतील पहिलीवहिली हॅटट्रिक घेतली होती. चहल तेव्हाही त्या मोसमात हॅटट्रिक घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला होता.

W,W,W,W, चहलने अशी घेतली हॅटट्रिक

चहलने त्याच्या कोट्यातील तिसऱ्या ओव्हरमध्ये ही हॅटट्रिक घेतली. चहलने त्याआधी 2 ओव्हरमध्ये 21 धावा लुटवल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या ओव्हरमध्ये चहलवर कमी धावा देण्याचं आव्हान होतं. चहल चेन्नईच्या डावातील 19 वी ओव्हर टाकायला आला. चहलने पहिला बॉल वाईड टाकला. त्यामुळे चहलला पुन्हा बॉल टाकावा लागला. धोनीने या बॉलवर षटकार लगावला. त्यानंतर चहलने दुसर्‍या बॉलवर धोनीला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. चहलच्या तिसऱ्या बॉलवर दीपक हुड्डाने 2 धावा घेतल्या.

चहलने त्यानंतर चौथ्या बॉलवर हुड्डाला प्रियांश आर्या याच्या हाती कॅच आऊट केलं. चहलने त्यांनतर पाचव्या बॉलवर अंशुल कंबोजला त्याच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केलं. आता चहल हॅटट्रिक बॉलवर होता. चहलसमोर नूर अहमद होता. मात्र चहलने नूरला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं. चहलने नूरला मार्को यान्सेन याच्या हाती कॅच आऊट केलं आणि हॅटट्रिक पूर्ण केली. चहलने अशाप्रकारे या ओव्हरमध्ये एकूण 4 विकेट्स घेतल्या.

हॅटट्रिकवीर युझवेंद्र चहल

चहल पंजाबचा चौथा गोलंदाज

दरम्यान युझवेंद्र चहल आयपीएलमध्ये पंजाबसाठी हॅटट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. पंजाबसाठी याआधी 2019 साली सॅम करन याने (Kings Eleven Punjab) अखेरची हॅटट्रिक घेतली होती. त्याआधी अमित मिश्रा याने 2011 साली अशी कामगिरी केली होती. तर युवराज सिंह याने पंजाबसाठी सर्वाधिक आणि पहिल्यांदा हॅटट्रिक घेण्याची कामगिरी केली होती. युवराजने 2009 या वर्षातच 2 वेळा हॅटट्रिक घेण्याचा कारनामा केला होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.