भारतीय मुजाहिद्दीन दहशतवादी अटक
Marathi May 02, 2025 10:30 AM

झारखंड एटीएसची अम्मार याशरवर कारवाई

वृत्तसंस्था/रांची

इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी अम्मार याशरला झारखंड अँटी टेररिस्ट स्क्वॉडने (एटीएस) अटक केली आहे. त्याच्याकडे संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. चौकशीदरम्यान त्याने आपण पूर्वी इंडियन मुजाहिद्दीन संघटनेसाठी काम करत असल्याची कबुली दिली आहे. दहशतवादी अम्मार याशरला 2014 मध्ये जोधपूर पोलिसांनी अटक करत तुरुंगात पाठवले होते. सुमारे 10 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर मे 2024 मध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर तो आपला मित्र अयान जावेद आणि धनबादच्या इतर हस्तकांशी संपर्क साधून बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्याच्याविरुद्ध लालकोठी जयपूर, राजस्थान आणि प्रतापनगर जोधपूर येथेही गुन्हा दाखल आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.