Actor Passed Away: मृत्यूशी झुंज अपयशी ठरली, प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीत शोककळा
Saam TV May 02, 2025 10:45 PM

vishnu prasad passes away: मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विष्णू प्रसाद यांचे वयाच्या 49व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी, २ मे रोजी कोची येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते किशोर सत्य यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती शेअर केली आहे. विष्णू प्रसाद हे बऱ्याच काळापासून यकृत (लिव्हरच्या) आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या लिव्हर ट्रॅन्सप्लान्टसाठी त्यानंरुग्णालयात दाखल करण्यात आले, पण, अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने अभिनेत्याची प्रकृती बिघडली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्यांना वाचवता आले नाही.

हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जात होते. त्यांनी अनेक सुपरहिट मल्याळम चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे उत्तम डॉयलॉग, भावपूर्ण अभिनय यामुळे ते प्रेक्षकांचे खास बनले होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांचे चाहते, परिवार आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

पैशांची व्यवस्था केली जात होती.

तथापि, अनेक माध्यमांमध्ये असे म्हटले जात आहे की अभिनेत्याचे लिव्हर ट्रॅन्सप्लान्ट होणार होते, परंतु त्याचे कुटुंब पैशांची व्यवस्था करू शकले नव्हते. अभिनेत्याची मुलगी तिला तिचे लिव्हर डॉनेट करणार होती, पण या उपचारासाठी ३० लाख रुपये खर्च येणार होता. निधी उभारण्यात अडचण येत असल्याने, त्यांनी असोसिएशन ऑफ टेलिव्हिजन मीडिया आर्टिस्ट्स (ATMA) कडून निधी गोळा करण्यास सुरुवात केली, परंतु १ मे रोजी अभिनेत्याची प्रकृती आणखी बिकट झाली.

अभिनयाव्यतिरिक्त विष्णू सामाजिक कार्यातही सक्रिय होते. त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरणासंदर्भातील अनेक उपक्रमांत सहभाग घेतला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर सहवेदना व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. अनेक सहकलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. ममूटी, यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही विष्णूच्या जाण्यामुळे मल्याळम चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं असल्याचे म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.