
बॉलीवूडचा बादशहा अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान ‘मेट गाला’मध्ये दिसणार आहे. ‘मेट गाला’ हा जगातील फॅशन शोमधील सर्वात मोठा इव्हेंट मानला जातो. शाहरुखच्या रूपाने पहिल्यांदाच भारतीय अभिनेता मेट गालाच्या रेड कार्पेटवर आपली स्टाईल दाखवताना दिसणार आहे. या इव्हेंटमध्ये शाहरुख खानसह बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणीसुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, याआधी अभिनेत्री दीपिका पादूकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांनी या प्रसिद्ध इव्हेंटमध्ये हजेरी लावलेली आहे.