creamy tuna fish salad for breakfast: दरवर्षी २ मे रोजी टूना दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र टूना फिश बद्दल जागृकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या फिशमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
या दिनानिमित्त तुम्ही सकाळी नाश्त्यात टूना फिश सॅलेड बनवू शकता. या सॅलडमध्ये उच्च पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी असतात. या सॅलेडमुळे पोट भरलेले राहते. टूना फिश सॅलेड बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.
क्रिमी टूना फिश सॅलडे बनवण्यासाठी लागणारे साहित्यटूना - २ कप
मेयोनेझ - १/४ कप
सेलेरी बारीक चिरलेली - १/२ कप
लाल कांदा बारिक चिरलेला - १/४ कप
लिंबाचा रस - १ टेस्पून
मीठ आणि मिरपूड - चवीनुसार
क्रिमी टूना फिश सॅलड बनवण्याची कृतीक्रिमी टूना फिश सॅलेड बनवण्यासाठी सर्वात आधी ट्यूना कॅन उघडा, पाणी काढून टाका आणि ट्यूना एका मध्यम प्रकारच्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढा. नंतर बाऊलमध्ये मेयोनेझ, चिरलेली सेलेरी आणि चिरलेला लाल कांदा घाला. नंतर, सर्व साहित्य चांगले एकत्र होईपर्यंत हलक्या हाताने मिसळा. मिश्रणावर ताजे लिंबाचा रस पिळून घ्या आणि चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. पुन्हा हलकेच मिसळा. सॅलड १५-२० मिनिटे झाकून ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा जेणेकरून चवी एकत्र येतील. थंडगार करून साइड डिश म्हणून, सँडविच फिलिंग म्हणून किंवा सॅलेड म्हणून सर्व्ह करू शकता.