फक्त १५ दिवसात मिळवा भरघोस परतावा; पोझिशनल ट्रेडर्ससाठी ब्रोकरेजने सूचवले ५ शेअर्स
ET Marathi May 02, 2025 08:45 PM
Top 5 Stocks For Short Term : आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शुक्रवारी (२ मे) भारतीय शेअर बाजारांनी जोरदार तेजीसह सुरुवात केली. परंतु, काही काळानंतर बाजाराने तेजी गमावली आणि तो रेड झोनमध्ये आला. बाजारातील अस्थिरतेदरम्यान अ‍ॅक्सिस डायरेक्टने पुढील १५ दिवसांसाठी पोझिशनल ट्रेडर्ससाठी ५ शेअर्स निवडले आहेत. यामध्ये एचडीएफसी एमएमसी, विप्रो, एमसीएक्स, Moil आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचा समावेश आहे. यासाठी लक्ष्य स्टॉप लॉस आणि कोणत्या पातळीवर खरेदी करावी याबाबत माहिती देण्यात आली आहे. एमसीएक्स शेअरमल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) चा शेअर ६३९१ रुपयांवर आहे. हा शेअर ६,२४९ ते ६,३१३ रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे योग्य ठरेल. यासाठी ६,८०२ रुपयांचे लक्ष्य आणि ६,१५० रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे. मोईल शेअरMOIL चा शेअर ३४७.२५ रुपयांवर आहे. हा शेअर ३३४ - ३३८ रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे योग्य ठरेल. यासाठी ४१३ रुपयांचे लक्ष्य आणि ३१३ रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे. एचडीएफसी एएमसी शेअरएचडीएफसी एएमसीचा शेअर ४४७६ रुपयांवर असून हा शेअर ४,४३५ ते ४,४८० रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे योग्य ठरेल. यासाठी ४,८१० रुपयांचे लक्ष्य आणि ४,३७० रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे. एचएएल शेअरसंरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HUL) चा शेअर ४५३७.७ रुपयांवर आहे. हा शेअर ४,५०५ ते ४,५६० रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे योग्य ठरेल. यासाठी ४,८९० रुपयांचे लक्ष्य आणि ४,४५० रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे. विप्रो शेअर आयटी कंपनी विप्रोचा शेअर २४४.०३ रुपयांवर असून हा शेअर २४३-२४५ रुपयांच्या श्रेणीत खरेदी करणे योग्य ठरेल. यासाठी २६९ रुपयांचे लक्ष्य आणि २३७ रुपयांचा स्टॉप लॉस देण्यात आला आहे. (Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.