Youtube भारतात 850 कोटींची गुंतवणूक करणार,भारतीय किएटर्सच्या कमाईबाबत यूट्यूबचे CEO म्हणाले…
Marathi May 02, 2025 09:30 PM

विणणे समिट 2025 मुंबई: मुंबईत वर्ल्ड जिओ सेंटरमध्ये पहिली जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (WEAVES) वेव्हज शिखर परिषद सुरु आहे. या परिषदेत यूट्यूब इंडियाचे सीईओ नील मोहन सहभागी झाले होते. भारत हा क्रिएटर्सचा बालेकिल्ला असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूट्यूब चॅनेलला 25 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. जगभरातील देशाच्या प्रमुखांमध्ये सर्वाधिक सबस्क्रायबर्स नरेंद्र मोदी यांचे असल्याचं नील मोहन म्हणाले.

भारतात 100 मिलियन चॅनेलवरुन गेल्या वर्षभरात व्हिडिओ अपलोड करण्यात आले. 15 हजार चॅनेलचे सब्सक्रायबर्स 10 लाखांपेक्षा अधिक आहेत. यूट्यूबनं गेल्या तीन वर्षात भारतातील किएटर्सला, माध्यमांच्या कंपन्यांना 21000 कोटी रुपये दिले आहेत. 23 एप्रिलला यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेल्या 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, असं नील मोहन यांनी म्हटलं.

Youtube चे सीईओ नील मोहन काय म्हणाले?

यूट्यूब चॅनेलचे सीईओ नील मोहन यांनी भारतात येत्या दोन वर्षात कंटेंट क्रिएशन अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी 850 कोटींची गुंतवणूक करणार आहे. नील मोहन म्हणाले की भारत हा क्रिएटर्स नेशन म्हणून पुढं आला आहे. ते पुढं म्हणाले भारतात बनवल्या गेलेल्या कंटेंटचा भारताबाहेरील वॉच टाईम 45  अब्ज तास इतका होता.

नील मोहन पुढं म्हणाले की यूट्यूब कोणत्याही ठिकाणच्या क्रिएटरला कोणत्याही ठिकाणच्या दर्शकाशी जोडते. यामुळं सांस्कृतिक आदान प्रदानाचं महत्त्वाचं साधन बनलं आहे. भारत फक्त जगभरात सिनेमा किंवा संगीत निर्मितीमध्ये पुढं नाही  तर वेगानं क्रिएटर्स नेशन बनत आहे. यूट्यूबनं क्रिएटर्सला यशस्वी उद्योजक बनवण्यात आणि जगभरात त्यांचे चाहते निर्माण करण्याची संधी दिली आहे.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन म्हणजेच व्हेवज शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत करण्यात आलं आहे. ही परिषद चार दिवस चालणार आहे. याची टॅगलाईन ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ आहे. जगभरातील क्रिएटर्स, स्टार्टअप्स, इंडस्ट्री लीडर्स आणि पॉलिसी मेकर्स एकाच ठिकाणी येणार आहेत. याद्वारे भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजीटल इनोवेशनचं जागतिक हब बनवणे हा याचा उद्देश आहे.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.