आरोग्यासाठी पैशांची चिंता नको. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत घ्या आणि उपचार सुरळीत करा.
ही योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांसाठी आहे. गंभीर आजारांसाठी उपचार खर्चासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब, महाराष्ट्रातील रहिवासी, ज्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत, ज्यांचे उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे.
कॅन्सर
हृदयरोग
किडनी ट्रान्सप्लांट
मेंदू विकार
इतर गंभीर आजार (सरकारी यादी प्रमाणे)
या वेबसाईटवर जा. अर्ज डाउनलोड करा किंवा ऑनलाईन भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सादर केल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल
यासाठी डॉक्टरांचे निदान व उपचार खर्चाचा अंदाजपत्रक. तसेच रुग्णाचे ओळखपत्र (आधार कार्ड) आणि उत्पन्न प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचे कागदपत्र.
रुग्णाच्या आजारानुसार आणि उपचाराच्या खर्चावर आधारित रक्कम मंजूर केली जाते. काही प्रकरणात लाखोंपर्यंत मदत मिळते.
या योजनेसाठी सर्व कागदपत्रे स्पष्ट व पूर्ण असावीत. तसेच अर्ज नीट व काळजीपूर्वक भरावा. वैद्यकीय अंदाजपत्रक विश्वासार्ह रुग्णालयातून घ्यावे.