शलाका तांबे - लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक
कधीतरी राग येतो आणि तो चटकन निघूनही जातो, तर कधी तोच राग खूप तास टिकतो, खूप दिवस टिकतो. कधी एखाद्या गोष्टीमुळे खूप आनंद वाटतो आणि ‘ते फीलिंग’ खूप वेळ टिकून राहते. कधी anxiety किंवा निराशा वाटते आणि ही निराशा अधूनमधून नकळत जाणवत राहते. या सगळ्या अनुभवांच्या मागे असतात भावना, त्यातून निर्माण होणाऱ्या जाणिवा आणि यावर अवलंबून असते आपली एकूण मनःस्थिती. यालाच इंग्रजीत आपण म्हणतो, इमोशन्स, फीलिंग्ज आणि मूड्स. मात्र, हे सगळे नेमके काय असतं आणि हे तिन्ही वेगळे कसे असते, आणि आपल्यावर यांचा कसा प्रभाव असतो, हेच आज आपण सोप्प्या भाषेत समजून घेणार आहोत.
उच्च भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली भावनिक साक्षरता (emotional literacy) वाढवायला हवी आणि यासाठी महत्त्वाचे आहे, की इमोशन्स, फीलिंग्ज आणि मूड्स यांच्यामधील फरक समजून घेणे.
इमोशन्सआपली ही समजूत असते, भावना आपल्या मनात उत्पन्न होतात. पण वास्तव हे आहे, की भावना या आपल्या शरीरात रसायनाच्या स्वरूपात उत्पन्न होतात आणि मग आपल्या मनात उमटतात. भावना म्हणजे तुमच्या शरीराची आणि मनाची एखाद्या घटनेवर झालेली पहिली प्रतिक्रिया. उदाहरणार्थ, तुमची एखादी आवडती व्यक्ती अचानक समोर आली, तर तुम्हाला एकदम आनंद होतो, हृदय धडधडते, चेहऱ्यावर हास्य येते. ही झाली एक प्रकारची भावना.
आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाप्रमाणे आणि योगशास्त्राप्रमाणे, आपल्या सर्वांमध्ये नऊ प्रकारच्या भावना नाहीत असतात. ज्यांना आपण नवरस असे म्हणतो. उदाहरणार्थ, राग, आनंद, भीती, दुःख, आश्चर्य, तिरस्कार, करुणा, वीर, बीभत्स. या भावना आपल्या शरीरात pre-programmed असतात. कोणतीही भावना सहसा खूप तीव्र असते; पण ती फार काळ टिकत नाही. असे म्हटले जाते, की भावना आपल्या शरीरात आणि मनामध्ये सुमारे सहा सेकंद राहतात किंवा टिकतात. कधीतरी कुणी आपल्याला surprise पार्टी देते, तेव्हा आपल्याला आश्चर्य या भावनेचा अनुभव होतो. हा पहिला repsone जो असतो, ती असते मूळ भावना. मग तुम्ही थोडा विचार केलात, तर तुमच्या हे लक्षात येईल, की ही पहिली आश्चर्याची भावना अनुभवल्यानंतर, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने react होते. surpsrise मिळाल्यावर आणि आश्चर्याची भावना अनुभवल्यानंतर, काही व्यक्ती, आनंदाने आरडू लागतात, काही व्यक्तींचे आनंदाश्रू यायला लागतात, काही जण अगदी आनंदाने overwhlem होतात. भावनेनंतर आलेला हा जो आपला रिस्पॉन्स असतो तो रिस्पॉन्स म्हणजे ‘फीलिंग’.
फीलिंग्जफीलिंग्ज आपण भावनांपेक्षा जास्त काळ अनुभवतो. फीलिंग्ज म्हणजे भावनेनंतर आलेला आपला रिस्पॉन्स असतात. हा रिस्पॉन्स प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, राग ही भावना आपण प्रत्येक जण अनुभवतो; पण तो राग आल्यावर आपण काय ‘फील’ करतो हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे असते, राग आल्यावर कुणी खूप संतापते, तर कुणी खूप घाबरते आणि थरथर कापायला लागते, तर कुणी राग आल्यावर काही क्षणात रडायला देखील लागते. कोणतीही भावना अनुभवल्यानंतर होणारी जी जाणीव असते ती असते फीलिंग, जी आपल्याबरोबर काही मिनिटे, काही तास राहते. कधी कुणी आपल्याला आपल्या कुठल्या गोष्टीबद्दल कॉम्प्लिमेंट देते, तेव्हा आपल्याला बराच वेळ स्वतःबद्दल छान वाटत राहते, तर कधी जर कुणी आपली टीका केली तर आपल्याला बराच वेळ त्याबद्दल वाईट वाटत राहते. भावना या आपल्या शरीरात उद्भवणाऱ्या क्षणिक लहरी असतात, तर फीलिंग्ज म्हणजे त्या लहरींचा आपल्या मनावर होणारा प्रभाव, जो आपण अधिक वेळ अनुभवतो आणि जेव्हा एखादे फीलिंग आपण दीर्घकाळ अनुभवतो, तेव्हा तो असतो आपला मूड.
मूड्सएखादी भावना आपण दीर्घकाळ अनुभवतो; म्हणजे काही दिवस, किंवा काही वेळेला काही महिने देखील असू शकतात, तेव्हा तो असतो आपला मूड. जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असतो, तेव्हा बऱ्याचदा असे होते, की तो प्रोजेक्ट संपेपर्यंत आपण थोडे चिडचिडे बनतो, किंवा सतत अस्वस्थ म्हणजे रेस्टलेस फील करतो, आणि यामुळे आपण सतत anxious असतो. हा असतो आपला त्या कालावधीतील मूड. आपल्या, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, आपल्या व्यक्तिमत्वानुसार, आपण आपले मूड्स अनुभवतो.
इमोशन्स, फीलिंग्ज आणि मूड्स या तिन्हीतला फरक काय, ही भावनिक साक्षरता खूप महत्वाची आहे. आपल्याला हे जाणून घ्यायला हवे, की भावना या आपल्या शरीर आणि मनाच्या नैसर्गिक प्रक्रियांमधील एक घटक आहेत. या नैसर्गिक क्रियेनंतर आलेला आपला रिस्पॉन्स म्हणजे फीलिंग्ज. आपल्या या फीलिंग्जच्या पॅटर्नने बनतो आपला मूड आणि आपली मानसिकता. भावना जरी नैसर्गिकरित्या उद्भवत असल्या, तरी त्यांना कसे रिस्पॉन्ड करायचे आणि आपल्या फीलिंग्जना कसे नियंत्रित करायचे, हे आपल्या हातात असते. आपल्या मानसिक स्वाथ्याच्या दृष्टीने, आपल्या फीलिंग्जना योग्यरित्या नॅव्हिगेट करता येणे, अत्यंत महत्त्वाचे असते. जेणेकरून आपण योग्यरीत्या आपल्या ताणाचे व्यवस्थापन करू शकतो, ‘अँगर मॅनेजमेंट’ करू शकतो, सकारात्मकपणे anxiety शी डील करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला देखील नीट ओळखू शकतो!
म्हणूनच इमोशन्स, फीलिंग्ज आणि मूड्स, यांच्यातील फरक समजून घेऊन, तुम्हीसुद्धा तुमची भावनिक साक्षरता आणि भावनिक बुद्धिमत्ता अजून प्रबळ करा.