मराठी Letter to Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला .या सत्काराची सध्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा आहे .या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंचं नाव अग्रस्थानी असल्याने मोठी चर्चा रंगली. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का अशी चर्चा रंगली होती . मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी)दरेगावात असल्याने ते या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहू न शकल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलगिरीचे पत्र लिहिले आहे . या पत्रात कार्यक्रमाचे कौतुक करत त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत . उपस्थित राहू शकत नसल्याचे कारणही त्यांनी पत्रात दिले आहे .
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांतर्गत कुरबुरी सुरू असताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार का ? याची उत्सुकता असताना एकनाथ शिंदेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलीय .महाबळेश्वर येथे सुरू असलेल्या महापर्यटन महोत्सवात अभिनेते नाना पाटेकर यांचा कार्यक्रम तसेच श्री श्री रविशंकर यांच्या जलतरा प्रकल्पाचे उद्घाटन असल्याने उपस्थित राहू शकत नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले आहे .कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याचे कळवत त्यांनी दिलगिरी ही व्यक्त केली आहे .
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज (3 मे) गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्राच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी याआधी देखील अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली आहे. ते एका मंचावर, एका कार्यक्रमासाठी अनेकदा एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यांनी साताऱ्यामध्ये एका बैठकीला शेजारी- शेजारी बसलेला आणि शरद पवारांनी अजित पवारांना बैठकीत आकडेवारी वाचताना मदत केल्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावरती मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता.
दुसरीकडे शिवसेना उबाठा गटाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सत्काराचे निमंत्रण देण्यात आलं होतं . त्यामुळे राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाची मोठी चर्चा आहे . महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीत गेलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर येणार का अशी उत्सुकता असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली . मात्र, महाबळेश्वरमध्ये असणाऱ्या कार्यक्रमामुळे गौरवशाली महाराष्ट्र कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलगिरीचं पत्र उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलं आहे.
हेही वाचा:
https://www.youtube.com/watch?v=lalcrptau0e
अधिक पाहा..