यदा कदाचित कुणाला निमंत्रण देणं राहून गेलं असेल, त्या माजी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी: अजित पवार
Marathi May 04, 2025 12:26 AM

मुंबई :उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात राज्याच्या आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी मुख्यमंत्री  नारायण राणे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला मविआशी संबंधित माजी मुख्यमंत्री उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहिले नाहीत. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून निमंत्रण मिळालं नसल्यानं उपस्थित राहण्याचा प्रश्न नाही असं सांगण्यात आलं. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी आपण माजी मुख्यमंत्री यांना बोलावल होतं. यदा कदाचित आमच्याकडून चुकून कुणाला माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण देण राहिलं असेल तर माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव घेणं टाळल्याचं पाहायला मिळालं.

उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही

गेली 35 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. राजीव गांधी यांच्या काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिली संधी मिळाली. सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात काम केलं. शरद पवारांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पाहिला, असं अजित पवार म्हणाले. आज बरेच मुख्यमंत्री इथ नाहीत. मी अशोक चव्हाण यांचा कार्यकाळ पाहिला. विदर्भाला चांगल्या प्रकारे संधी मिळाली मराठवाड्यात देखील मान्यवरांना संधी मिळाली पश्चिम महाराष्ट्रात देखील संधी मिळाली. कोकणालही संधी मिळाली.  ६५ वर्षानंतर महिला मुख्यमंत्री झाली नाही. आम्हालाही वाटत महिला मुख्यमंत्री व्हायला हवी. केवळ उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही. 2004 साली ती संधी आली होती मात्र काय झालं हे प्रफुल पटेल यांना माहिती आहे, असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्याचा दरारा काय असू शकतो हे मी नारायण राणे यांच्या रूपाने पाहिलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा मी पाहिलं नारायण राणे यांनी सभागृहात नुसतं मागे पाहिलं तरी सगळे शिवसेना आमदार चिडीचूप होऊन जायचे, असं अजित पवार म्हणाले. अशोक चव्हाण आणि मी एकाच बॅचचे आहोत, त्यांना कमी कार्यकाळ मिळाला, असं अजित पवार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचा ४ वाजता फोन आला त्यांनी ते दरे गावात असल्याचं सांगितल. नाना पाटेकर आणि श्री श्री रविशंकर यांचा कार्यक्रम असल्यामुळे ते आले नाहीत.आपण ज्यावेळी यशवंतराव चव्हाण यांचं नाव घेतो त्यावेळी सर्वसमावेशक राजकारण करायला हवं. सुसंस्कृत राजकारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शिकवले आहे. जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. असे अनेक निर्णय एनडीए’च्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत.

एकनाथ शिंदे यांना मी सांगणार आहे जर त्यांना येण शक्य नसेल तर प्रतिनिधी पाठवू नका कारण हा सन्मान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा सन्मान आहे. त्यांनीच तो स्वीकारला असता तर बर वाटलं असतं, असंही अजित पवार म्हणाले.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.