makhana oats recipe: रविवारचा दिवस खास बनवायचा असेल तर सकाळी नाश्त्यात मखाना ओट्स टिक्की बाऊल तयार करू शकता. मखाना ओट्स टिक्की बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. मखाना खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. तसेच मखानामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मखाना ओट्स टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
मखाना ओट्स टिक्की बनवण्यासाठी लागणारे साहित्यओट्स
मखाना
चाट मसाला
बारिक चिरलेला कांदा
बारिक किसलेला गाजर
मीठ
आलं-लसून पेस्ट
चिली फ्लेक्स
तेल
मखाना ओट्स टिक्की बनवण्याची कृतीमखाना ओट्स टिक्की बनवण्यासाठी सर्वात आधी मखाना आणि ओट्स पाण्यात भिजत ठेवावे. नंतर एका बाऊलमध्ये वाफवलेला बटाटा, मका, बारिक चिरलेला कांदा, बारिक किसलेला गाजर, बारिक चिरलेली कोथिंबीर, आलं-लसून पेस्ट, चाट मसाला, गरम मसाला, चिली फ्लेक्स लिंबाचा रस टाका. नंतर मखाना आणि ओट्सचे मिश्रण त्यात टाका आणि हाताने चांगले एकजीव करावे. नंतर टिक्की तयार करावी. तवा गरम करून त्यावर तपकिरी होईपर्यंत भाजून घ्यावे.