सोन्याची किंमत: भारतातील सोन्याचे दर (Gold Price) आता 1 लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरुन खाली येत आहेत. यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना एक प्रकराचा दिलासा मिळाला आहे. अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की यावेळी सोने खरेदी करणे योग्य आहे की किंमत आणखी कमी होण्याची वाट पाहावी. आज भारतात सोन्याच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झाल्याचे वृत्त नाही.
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 20 ग्रॅम 87550 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 95510 रुपये होता. जर आपण तुलना केली तर, शुक्रवारी हे दर अनुक्रमे 877740 रुपये आणि 95720 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, म्हणजेच शुक्रवारच्या तुलनेत थोडीशी घट झाली आहे.
दिल्ली आणि जयपूरमध्ये 22 कॅरेट सोने 87700 रुपये आणि 24 कॅरेट सोने 95660 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. अहमदाबाद आणि पटना येथे 22 कॅरेट सोने 87600 रुपये आणि 24 कॅरेट सोने 95560 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 87550 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 95510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहे. सोन्यासोबतच चांदीचे दरही स्थिर राहिले. शुक्रवारप्रमाणेच आज मुंबईत चांदीचा दर 98000 रुपये प्रति किलोवर स्थिर राहिला.
तज्ज्ञांच्या मते, भारतातील सोने आणि चांदीचे दर आंतरराष्ट्रीय बाजार, आयात शुल्क, सरकारी कर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉलर आणि रुपयामधील विनिमय दर यावर अवलंबून असतात. याशिवाय, भारतातील सोन्याचे सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व देखील त्याची मागणी वाढवते, विशेषतः लग्न आणि सणांच्या काळात. सध्याच्या बाजारातील परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांनी आणि दागिने खरेदीदारांनी किमतींमधील चढ-उतारांवर लक्ष ठेवले पाहिजे. सोन्याचे भाव सध्या त्यांच्या सर्वोच्च पातळीपेक्षा सुमारे 7000 रुपयांनी कमी आहेत, त्यामुळे काही तज्ञ ही खरेदीची चांगली संधी मानत आहेत.
सोन्याच्या वाढत्या किमतीची कारणे पाहिल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे सध्या प्रचंड गोंधळ उडाला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये सध्या व्यापारयुद्ध सुरू आहे. दोन आर्थिक महासत्तांमधील हे व्यापारयुद्ध आणि डॉलरचे मूल्य घसरल्याने गुंतवणूकदारांना सोन्यावर अवलंबून राहावे लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..