Maharashtra News Live Updates : रायगड जिल्ह्यात मनसैनिकांनी दिला परप्रांतीय तरुणाला चोप
Saam TV May 04, 2025 02:45 PM
नांदेडची जीवन वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरी नदीला जलपर्णीने घातला विळखा

गोदावरी नदीचे नाभी स्थान म्हणून नांदेड शहराची ओळख आहे. नांदेडची जीवन वाहिनी असणाऱ्या गोदावरी नदी घाटावर अनेक धार्मिक स्थळे आहेत.

जगप्रसिद्ध गुरुद्वारा देखील गोदावरी नदीच्या काठावर आहे. त्यामुळे या ठिकाणी देश, विदेशातील भावी नांदेडमध्ये येत असतात.

गोदाकाठी अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. परंतु पवित्र समजल्या जाणाऱ्या या गोदावरी नदीला जलपर्णीने विळखा घातला आहे.

गोदावरी नदीच्या या काठावर अनेक पवित्र असे घाट आहेत. या संपूर्ण घाटावर जलपर्णी व्यापली आहे.

चार ते पाच मोठ्या नाल्याचं घाण पाणी देखील याच गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत. त्यामुळे गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे.

गोदावरी नदीचा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका यावर लाखो रुपयांचा खर्च करते. परंतु गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास महापालिकेला सपशेल अपयश आल्याचे दिसून येत आहे.

गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यास महापालिका अपयशी ठरली असून महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी डॉक्टर किरण शिल्लेवार यांनी केली आहे.

Parbhani: काँग्रेसच्या वतीने आज परभणी येथे सद्भावना यात्रेचे आयोजन

काँग्रेसच्या वतीने परभणी येथे सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आल आहे.

यासाठी नांदेड वरून खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

गढूळ राजकारणाला नवी दिशा देण्यासाठी या सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आल आहे अशी महिती काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतून पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत शोभा यात्रा

महाबळेश्वर पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने महाबळेश्वर येथे तीन दिवसाचा पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला असून आजच्या दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर येथील आराम चौक या ठिकाणाहून मुख्य बाजारपेठेतून पारंपारिक वाद्य वाजवीत पारंपारिक वेशभूषेत भव्य शोभा यात्रेला सुरुवात झाली आहे.. या शोभायात्रेत परदेशी नागरिक यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले पर्यटक देखील सहभागी झालेले आहेत.. विशेष म्हणजे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई सहकुटुंब या शोभा यात्रेमध्ये सहभागी झाले

Raigad: मनसैनिकांनी दिला परप्रांतीय तरुणाला चोप

० रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील घटना

० श्रीवर्धन येथे पुनिर गौरव या नावाने निर्माण होणाऱ्या रहिवाशी सोसायटीमधील परप्रांतिय कामगार स्थानिकांना दमदाटी, हुल्लडबाजी करीत असल्याची होती तक्रार

० पुनिर गौरवच्या कार्यालयात जाऊन मन सैनिकांनी सदर परप्रांतिय तरुणांला जाब विचारत दिला चोप

० मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर होत आहे व्हायरल

Shirdi: धमकीच्या मेलनंतर साई संस्थान अलर्ट, दर्शन रांग प्रवेशद्वारावर केली जातेय कसून तपासणी

शिर्डीच्या साईबाबा संस्थानला धमकीचा मेल आल्यानंतर साई संस्थान अलर्ट झाले आहे..

भाविकांना दर्शन रांगेत सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जातेय..

कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही याची काळजी घेतली जात असून पोलीस यंत्रणा देखील साई मंदिर परिसरात गस्त घालताना दिसत आहे..

आलेला मेल खोडसाळपणा की आणखी काही याबाबत यंत्रणा तपास करत असून साई संस्थान अलर्ट मोडवर दिसून येतेय...

Beed Crime: बस स्थानकात चोऱ्याचे प्रमाण वाढले, बसमध्ये बसताना आणखी एका महिलेचे दागिने चोरीला

- वृंदावनी नरवडे नामक महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला.

- अज्ञात चोरट्याच्या विरोधात माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल.

- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना यात्रेला सुरुवात

काँग्रेसच्या वतीने परभणीत पोखरणी ते परभणी दरम्यान सद्भावना यात्रा संविधान बचाव रॅली चे आयोजन करण्यात आलेल आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज पोखर्णी नरसिंह येथे ध्वजारोहण पार पडलं त्यानंतर पोखरणी येथील प्रसिद्ध नरसिंहाचे दर्शन हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतल आणि यानंतर या यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आज दिवसभरात 20 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा आज सायंकाळी परभणीत पोहोचणार आहे

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर फॉर्चूनर गाडीचा भीषण अपघात, अपघातात चार गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील सुकांडा गावाजवळ फॉर्चूनर गाडीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये चार जन गंभीर जखमी झालेत.

हे प्रवासी मुबंई वरून बिहारला जात होते.

आज पहाटेच्या सुमारास गाडीचा टायर फुटल्यानं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दुभाजकाला धडकली, मागील दोन एयर बॅग नं उघडल्यानं दोन प्रवाशी गंभिर जखमी झालेत.

अन्वर आलम, सय्यद आलम आणि इतर दोन जन जखमी आहेत. गावाकऱ्यांच्या मदतीने जखमीला उचरासाठी वाशिम येथे खाजगी दवाखान्यात हलवण्यात आलंय.

आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द, सहा महिन्यांचा शस्त्रसाठा निर्मितीचे आदेश

पहलगाम हल्ल्यानंतर दोन देशातील तणाव लक्षात घेता भारत सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

युद्धाची स्थिती निर्माण झालीच तर आयुधांची कमतरता पडू नये, यादृष्टीने देशातील सर्व आयुध निर्माणींना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथेही आयुध निर्माणी असून, त्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या कालपासून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या आधी मंजूर झाल्या, त्यांनाही कामावर तातडीने रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भद्रावती आयुध निर्माणीत पिनाका नावाचे मिसाईल, 155 - बोफोर्स सेल, 81 mm marter आणि ग्रेनेडस् निर्मिती केली जाते.

पुढील सहा महिने पुरेल एवढा शस्त्रसाठा निर्माण करण्याचे उद्दिष्ट इथे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे भद्रावती आयुध निर्माणी कामाला लागली आहे.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार संग्राम जगताप यांची सांत्वनपर घेणार भेट..

माजी आमदार अरुण काका जगताप यांचे दोन दिवसांपूर्वी झाले होते निधन..

भेटी नंतर संभाजीनगरकडे होणार रवाना...

Pune: पुण्यात आणखीन एक बाल न्यायालय मंडळ उभारण्यात येणार

सध्या पुण्यात बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यात प्रलंबित दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी आणखीन एक बाल न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला

आता पुण्याच्या बाल न्याय मंडळात तब्बल पावणेचार हजाराहून अधिक दावे प्रलंबित आहे

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासाठी अतिरिक्त बाल न्यायमंडळ स्थापन करण्याचा प्रस्ताव पुण्याचे मुख्य जिल्हा न्यायाधीश यांनी उच्च न्यायालयाच्या बाल न्याय समितीकडे पाठवला होता यावर समितीने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे

SSC-HSC Result: दहावी, बारावीचा निकाल लवकरच

'राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे.

येत्या १५ मेपर्यंत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होतील,' अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षा दर वर्षीपेक्षा यंदा दहा दिवस लवकर सुरू झाल्या. विद्यार्थ्यांना पुढील करिअरच्या दृष्टीने नियोजनासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून परीक्षेसोबतच निकाल देखील लवकर जाहीर केला जाणार आहे.

सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालाचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

साधारणपणे पाच ते दहा जून या कालावधीत दहावीचा निकाल जाहीर होईल, तर १५ मेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

Maharashtra News Live Updates : जालन्यातील गोदावरी नदीत पाणी आटल्याने मृत माशाचा खच

जालन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणी पातळीत प्रचंड घट होत आहे नदी, धरणे देखील कोरडे पडत आहे. जालन्यातील पाथरवाला बुद्रुक येथील गोदावरी नदीवरील निम्न उच्च पाणीपातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने नदीपात्रात मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. गोदावरी निम्न उच्च पाणीपातळी बंधाऱ्यातील पाणी आटल्याने मासे पाण्याअभावी तडफडून मृत पावत आहे. जालन्यात पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर नदीपात्रातील पाणी आटल्याने अशाप्रकारे माशांचा देखील तडफडून मृत्यू होत असल्याचं पाहायला मिळतय.

गणपती बाप्पा निघाले परदेशी

गणेश उत्सवाला अजून बराच कालावधी असलातरी गणपतीच गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशोत्सवा पूर्वीची लगबग सुरु झाली आहे. केवळ महाराष्ट्र, देशात नव्हेतर पेणमधील गणेश मुर्तींना परदेशातही मोठी मागणी आसते. पेणमधुन प्रतीवर्षी लाखोच्या संख्येत गणेश मुर्ती परदेशात पाठवल्या जातात. या वर्षी या मागणीत वाढ झाली असून पेणमधुन गणेश मुर्ती परदेशात रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ऑस्टेलिया, दुबई, साउथ आफ्रीका, वेस्टइंडिज, कॅनडा आदी देशात हजारोच्या संख्येत गणेश मुर्ती पाठवण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 फुटा पासून ते 7 फुटांपर्यंतच्या गणेश मुर्तीं असून यामध्ये कापडी फेटा, कापडी धोतर, शेला यासह डायमन्ड, इमेटेशन ज्वेलरी असणाऱ्या गणेश मुर्तींना परदेशातील अनिवासी भारतीयांकडून मोठी मागणी पहायला मिळत आहे.

Express: सुट्टया, लग्नसराईमुळे रेल्वे गाड्यांना गर्दी, बुकींग फुल

शाळा, महाविद्यालयांना लागलेल्या सुट्ट्या, लग्नसराई यामुळे नियमित धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागलीय.

तसेच सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी जाणा-यांची वाढलेली संख्यामुळे आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात सोडण्यात आलेल्या विशेष समर स्पेशल गाड्यांचे मनमाड, नाशिक, भुसावळ येथील रिजर्वेशन थेट ८ जून पर्यंत फुल्ल आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यां बरोबरच पर्यंटनासाठी हिमाचल प्रदेशला पसंती देत असल्याने उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज स्वत: राजूर गावाला भेट देणार

कावीळ रुग्णांची भेट आणि शासकीय अधिकाऱ्यांसमवेत घेणार आढावा बैठक...

अकोले तालुक्यातील राजूर गावात काविळचा प्रादुर्भाव...

काविळने घेतले दोन बळी...

प्रियंका शेंडे ( वय 22 ) आणि मिझबा शेख ( वय 10 ) यांचा काविळने झालाय मृत्यू ...

गावातील 140 हून अधिक नागरिकांना काविळचा प्रादुर्भाव...

गेल्या 15 दिवसांपासुन काविळचे थैमान...

ग्रामस्थांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात रोष...

Amravati: अमरावतीमध्ये सुरू असलेल्या ऑल इंडिया फेडरेशन कब कबड्डी स्पर्धेचे आज होणार अंतिम सामने

विदर्भ अँम्यच्युअर कबड्डी असोसिएशन अमरावती, जिल्हा कबड्डी असोसिएशन व शोध प्रतिष्ठानच्या वतीने अमरावतीमध्ये सुरू असलेल्या चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन पुरुष, महिला कबड्डी स्पर्धेला दोन दिवसापासून मोठ्या थाटात सुरुवात झाली..

यामध्ये देशातून पुरुषांचे नऊ संघ तर महिला गटातून नऊ संघांनी सहभाग घेतला असून देशभरातील 300 खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहे.

देशात प्रथमच महिला व पुरुष दोन्ही गटातील ऑल इंडिया फेडरेशन कबड्डी कप एकाच मैदानावर अमरावती येथे होत आहे...आणि याच स्पर्धेतून कबड्डीचा विश्व कप चा संघ सुद्धा आज अमरावती मध्ये निवडल्या जाणार

सर्व खेळाडू आपले कौशल्य या ठिकाणी दाखवत आहे यामध्ये पुरुष गटातून विदर्भ, महाराष्ट्र, राज्यस्थान, सर्विसेस, हरियाणा संघाने उत्कृष्ट आपल्या कबड्डी खेळाचे सादरीकरण केले.

तर महिला गटातून चंदीगड, हिमाचल, रेल्वे संघाने सुद्धा या ठिकाणी आघाडी घेतली आहे. आज या तीन दिवसीय चौथ्या ऑल इंडिया फेडरेशन कप च्या स्पर्धेचे अंतिम सामना होणार असून या सामन्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यात केवळ 7825 वाहनांवरच एचएसआरपी नंबर प्लेट

2019 पुर्वीच्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट एचएसआरपी बसवण्यात येत आहेत.मात्र वाहन मालकांकडून मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे ही कार्यवाही अत्यंत संथपणे सुरू आहे.

जिल्ह्यात केवळ 7 हजार 825 वाहनांना नंबर प्लेट बसविण्यात आली आहे. जिल्ह्यात वाहनांना एचएसआरपी लावणे बंधनकारक असलेली 2 लाख 68 हजार 149 वाहने आहेत.

दरम्यान उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून गेल्या काही महिन्यांपासून वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याची कारवाई सुरू आहे.

आतापर्यंत तीन टक्के ही उद्दिष्ट पूर्ण झालं नाही.ही नंबर प्लेट लावण्यासाठी 15 हजार 837 वाहन मालकांनी अर्ज केले आहेत.

त्यापैकी 7825 वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे.एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी जिल्हाभरात 10 केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30 जून पर्यंत मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ न मिळाल्यास नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Karjat Railway Station: कर्जत रेल्वे स्थानकात एक्सप्रेस थांबाव्यात; केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे कर्जतकरांची मागणी

कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी कर्जतकरांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शनिवार एका विशेष रेल्वेगाडीने पुणे येथे जात असताना त्यांच्या रेल्वेगाडी काही तांत्रिक कारणांमुळे कर्जत स्थानकावर थांबविण्यात आली होती.

यावेळी स्थानिक भाजप कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संघटनांनी रेल्वे मंत्र्यांचे स्वागत करून निवेदन दिल.

लॉकडाऊनपूर्वी कर्जत स्थानकात थांबणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद झाल्याचे सांगताना ते थांबे पूर्ववत करावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

कर्जतमध्ये एक्सप्रेस गाड्या थांबल्यामुळे कर्जत, खोपोली, मोहपाडा, रसायनी, बदलापूर, अंबरनाथसह परिसराचा विकास होईल.

येथील प्रवाशांना कल्याण स्थानकावर जाऊन गाड्या पकडाव्या लागण्याची वेळ येणार नाही, त्याच बरोबर माथेरानला येणाऱ्या पर्यटकांमध्ये देखील वाढ होईल असे या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

संभाजी ब्रिगेडमंत्री संजय शिरसाट यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे Kalyan: कल्याणमधील बैलबाजार परिसरातील धक्कादायक घटना, तबेल्यात सुरू होता कत्तलखाना

कल्याण पश्चिमेकडील गोविंदवाडी परिसरात तबेल्यातच बैलांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रकार उघडकीस आला आहे.

याची माहिती मिळताच याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी छापा मारत वसीम जैनुलआबेदिन गुझर या आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दोन बैलांची बैलाची सुटका केले आहे .वसीम कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना तबेल्यातच कत्तलखाना चालवत होता .

Tuljapur: तुळजाभवानी मंदिरात बोगस व्हीआयपींना 'थेटदर्शन'बंदी, मंदिर प्रशासनाने तक्रारींच्या अनुषंगाने घेतला निर्णय

तुळजाभवानी मंदिरात आता बोगस व्हीआयपींना थेट दर्शन बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

व्हीआयपी पास वाटपावरून अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मंदिर प्रशासनाकडुन यापुर्वी वेगवेगळ्या क्षेत्रातील ख्यातमान व्यक्तींना पास देण्यात येत होते

मात्र यामध्ये काही राजकीय व्यक्तींच्या नातेवाईकांना देखील पास देण्यात येत असल्याची चर्चा होत्या तसेच व्हिआएपी दर्शन पासमध्ये भट्राचार केला जात असल्याच्या तक्रार खा.ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी केली होती

त्यानंतर आता बोगस व्हीआयपींना दर्शन पास न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांसाठी २००-५०० रुपयांचे सशुल्क दर्शनाचे पास उपलब्ध आहे.

आमदार,माजी आमदार,राज्य सरकार मधील विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी यांना मंदिर संस्थानने व्हिआएपी दर्शनाची सोय ठेवली आहे.

मात्र कोणीही व्हिआएपी आहे अस सांगणाऱ्यांना मात्र व्हिआएपी दर्शनाची संधी मिळणार नाही अशी माहीती मंदीर संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

Hingoli: हिंगोलीत बळीराजांनी शेतीच्या मशागत वेळेत केला तापत्या उन्हामुळे बदल

हिंगोली जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा पारा हा 42 सेल्सी अंशाच्या पुढे गेला आहे,

वाढत्या उष्णतेमुळे हिंगोली शहरातील रस्ते निर्मनुष झाले आहेत तर रस्त्यांवर शुकशुकाट पसरला आहे

त्यातच आता खरिपाच्या हंगामाची तयारी करताना बळीराजांनी देखील आपल्या शेतीतील कामाच्या वेळेत बदल केला आहे,

दिवसभर शेतात राबणारा बळीराजा देखील जनावरांची व कुटुंबाची काळजी घेत घेताना पाहायला मिळत असून सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी चार ते सात या वेळेत शेतीमधील मशागतीची कामे पूर्ण करत आहे

तर महिला मजुरांनी देखील याच वेळेत आपली शेतीमधील कामे उरकून घेत उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी शेतीच्या कामाच्या वेळेत बदल केला आहे

Yavatmal Crime: लाडक्या बहिणीच्या गळ्यातील दागिने चोरट्यांच्या निशाणावर

सध्या लग्नसराई सुरू आहेत. अशात महिलांची गर्दी बस स्थानकावर प्रचंड प्रमाणात दिसून येत आहे.

यवतमाळ येथील नवीन बसस्थानकमध्ये येणाऱ्या लाडक्या बहिणींच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांच्या निशाणावर आले आहे सातत्याने बसमध्ये चढताना महिल्यांच्या सोन्याच्या दागिन्यावर चोरटे डल्ला मारत आहे

पोलीस ठाण्यात सातत्याने तक्रारीचा ढिगारा पडत असून सुद्धा चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश मिळत नाही त्यामुळे बस स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

एसटी कामगार संघटनेचे दोन दिवशीय अधिवेशन माणगावला

महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेचे 57 वे महाअधिवेशन 5 आणि 6 मे रोजी रायगडच्या माणगाव येथे होणार आहे.

या अधिवेशनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनाला राज्यभरातील 40 ते 50 हजार कर्मचारी उपस्थित राहणार असून अधिवेशनाची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

कामगार कराराच्या तरतुदीनुसार एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीचा दर लागू करण्याचे मान्य केलेले असतानाही महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे.

औद्योगिक न्यायालयाने थकबाकी देण्या बाबतचा निर्णय देऊन सुद्धा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही.

याबरोबरच महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढीसह कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर या अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा होईल.

जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार

जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचा परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे व्हावा याकरिता कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या वर्षांपासून पाठपुरावा केला.

त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी गावाची पाहणी करून परतीचा मुक्काम कुंजीरवाडी येथे होणार असल्याचे निश्चित केले.

Pune News: प्राधिकरणाची अवैध होर्डींगवर कारवाई

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे.

हवेली तालुक्यात लोणी काळभोरमध्ये नुकतीच तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग काढण्यात आले.

वाघोलीतील (ता.हवेली) चालू बांधकामावर तसेच बावधनमधील (ता. मुळशी) बकाजी कॉर्नर ते स्मशान भूमीपर्यंत रस्त्याच्या दुर्तफा अतिक्रमणे काढण्यात आली.

यात ३९ पत्राशेड, आरसीसी कट्टा, कंपाऊंड वॉल व टपरी आदी स्ट्रक्चर्स जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे रस्त्यावरील वाहतुक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

Maharashtra Politics: रिपब्लिकन (आठवले) पक्षातुन मिनाज मेनन व वसिम पहिलवान यांची हकलपट्टी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहरातील विशेष कमिटीची बैठक पक्ष कार्यालयामध्ये पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,

सदरच्या बैठकीमध्ये मिनाज मेमन व वसिम पहिलवान यांची एकमताने ठराव करून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

या दोघानी पक्षाला बदनाम करणारे कृत्य वारंवार केले आहे. पक्षाला त्यामुळे मानहानी सहन करावी लागली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली आहे.

Yavatmal Water Shortage: यवतमाळ जिल्ह्यातील 19 गावात भीषण पाणीटंचाई

यवतमाळ जिल्ह्यातील एकोणीस गावात टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे या गावात जीवन प्रधिकरण पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजनांची कामे चालू आहेत यातील काही कामांची प्रगती 50% हून अधिक तर काही कामे आताही 50% पेक्षा कमी प्रगतीपथावर आहे.ही कामे तातडीने करण्याच्या दृष्टीने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी सूचना दिल्या आहेत. मात्र 19 गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे टँकरने जरी पाणीपुरवठा होत असल्या तरी टँकर वेळेवर पोहोचत नसल्याने गावातील महिलांना पाणी आणण्यासाठी कोसो दूर भटकंती करावी लागत आहे.

NEET Exam: आज देशभरात वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात NEET ची परीक्षा

देश पातळी वरील नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे घेण्यात येणारी "वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा" अर्थात NEET होत आहे ,

या परीक्षेसाठी देशातील ५५२ तर इतर १२ देशात १४ अशी ५६६ शहरातील ५ हजार केंद्रावर ही परीक्षा होत आहे.

दुपारी २.०० ते ५.०० यावेळेत ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार असून देशभरात प्रशासनाने मोठी तयारी केली आहे.

यावर्षी या परीक्षेसाठी २३ लाख ३३ हजार २९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

एकूण ७२० गुणांसाठी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेनंतर वैद्यकिय प्रवेशाचा मार्ग खुला होतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा या परीक्षेसाठी बघायला मिळते.

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात प्रतिबंधित राऊंडऑफ बीटीची मागणी

शेतीचे अर्थशास्त्र बियाणे खते नापिकी यात फसले असून शेतकऱ्यांना सातत्याने सोयाबीनच्या पिकातून नुकसान झेलावे लागत आहे

अशा स्थितीत शासनमान्य कापूस बियाणे लागवड करणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही

त्यामुळे सोयाबीनला पर्याय म्हणून राऊंडऑफ कापूस बियाण्याची मागणीची वाढत आहे

काळ्या बाजारात जवळपास पाच लाख पाकीट हे प्रतिबंधित बियाणे विक्रीचा अंदाज आहे.

दिग्रस,पुसद आणि दारव्हा या तालुक्यांमध्ये प्रतिबंधित कापूस बियाणाला अधिक मागणी असून त्या परिसरात याची उलाढाल आतापासूनच सुरू आहे.

Nashik: एक्सप्रेस कँनोलमधून सुटलेल्या पाण्याला उग्र वास, मासे मृत

नाशिकच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून वैजापूर, गंगापूर गावांसाठी एक्सप्रेस कँनोल मधून शुक्रवारी रात्री पाणी सोडण्यात आले,

काल दुपारनंतर हे पाणी येवला तालूक्यातील महालखेडामधून पुढे जात असताना गावातील काही तरुणांना पाण्यातून मृत मासे त्याच बरोबर पाण्याला उग्र दुर्गंधीयुक्त वास येत असल्याच लक्षात आले असता त्यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता त्यांना समर्पक उत्तरे मिळू शकली नाही.

पाणी दूषित कशामुळे झाले याचा तातडीने शोध घेण्याची मागणी करण्यात येतेय.

Yavatmal Accident: दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

उमरखेड पंचायत समिती मधून काम आटोपून आपल्या गावी जात असताना ग्रामपंचायत ऑपरेटरचा समोरासमोर झालेल्या मोटरसायकलच्या धडके जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

दोन दुचाकीची समोरासमोर धडक, धडकेत ग्रामपंचायत ऑपरेटरचा घटनास्थळी मृत्यू

ढाणकी ते बिटरगाव रोडवरील अटारी नाल्याजवळील घटना,बजरंग भद्रावळ असे जागीच ठार झालेल्या मृताचे नाव

Maharashtra Politics: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहार व समतेचे निळे वादळ संघटना आक्रमक

सत्तेत आल्या बरोबर पहिल्या कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करू, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने अद्याप पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही उलट आम्ही कर्जमाफी करू शकत नाही अस घोषित केलंय...

या सरकारच्या फसवेगिरी विरोधात प्रहार संघटना व समतेचे निळे वादळ या दोन संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत..

मलकापूर येथे ह्या दोन्ही संघटनानी उपविभागीय अधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढून निदर्शने केली..

जर शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा या मागण्या मंजूर केल्या नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय...

Shegaon: शेगाव तालुक्यात पाणी टंचाई, नागरिकांना भरावे लागते लिकेज् व्हॉल्ववरून पाणी

जळगाव जामोद मतदार संघातील शेगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे ..

त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना पाईप लाईनचे लिकेज् वाल्व्ह वरून नंबर लावून पाणी भराव लागत आहे ..

खामगाव , शेगाव तालुका हा अकोला परिसराला जोडलेले असल्याने या भागात सध्या उन्हाचा तडाखा सुद्धा मोठ्या प्रमाणात असून या भागात 43 डिग्रीचे वर तापमान असताना ही नागरिकांना पाणी मिळत नाही ..

या भागात वारी हनुमान वान प्रकल्पातून पाईप लाईन टाकून 140 गाव पाणीपुरवठा मंजूर आहे..

काहीचे काम अद्याप अपूर्ण आहे तर काही गावात पाणी पोहचेल आहे ..

मात्र ज्या गावात अद्याप पाणी पोहचले नाही त्या गावात ग्रामस्थांना विहिरीवरून, खाजगी टँकर ने तर काहीना लिकेज् व्हॉल्व चां आधार घ्यावा लागतो...

जिल्हा प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे..

Ulhasnagar: ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कोसळून वृद्धाला दुखापत

भाटीया नावाचे वृद्ध इसम पहाटे ४ वाजता सत्संगला जाण्यासाठी पायी निघाले होते.

यावेळी रस्त्यात ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात ते कोसळले.

यावेळी त्यांना उठता येत नसल्याने त्यांनी आवाज देण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून स्थानिकांनी तिथे धाव घेत भाटीया यांना बाहेर काढलं.

यावेळी त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला दुखापत झाल्याचं समोर आलं. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

Matheran Hill Station: माथेरानमध्ये ई-रिक्षा वाढवण्याची मागणी

माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात ई-रिक्षा संख्या वाढवण्याची गरज आहे अशी मागणी पर्यटक आणि माथेरान कर करताना दिसून येत आहेत

मात्र राज्य सरकारकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये त्यामुळे माथेरानच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे

सध्या माथेरानमध्ये ई-रिक्षा 20 असल्याने 74 इतक्या ई रिक्षा करण्यात यावी आहे अशी मागणी माथेरानकर करत आहेत

तसेच तरुणांना सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार संधी माथेरानमध्ये मिळणार आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.