'कसौटी जिंदगी की 2' ही प्रेक्षकांची आवडती मालिका होती. या मालिकेने खूप काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या मालिकेमुळे कलाकारांना देखील खूप प्रसिद्धी मिळाली आहे. 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेत काम केलेल्या अभिनेत्रीच्या आयुष्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. टीव्ही अभिनेत्री सोन्या अयोध्या (Sonyaa Ayodhya ) हिचा घटस्फोट झाला आहे. ती आपल्या पती हर्षपासून विभक्त झाली आहे.
सोन्या अयोध्याचा तब्बल 5 वर्षांचा मोडला आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात तिच्या घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वयाच्या 29 वर्षी तिने घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोन्या अयोध्या आणि हर्षने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा रंगली होती. तसेच त्यांनी इन्स्टाग्रामवरील एकमेकांसोबत असलेले फोटो देखील हटवले आहेत. मात्र अद्यापही घटस्फोटावर सोन्या अयोध्या कोणतेही भाष्य केले नाही आहे.
आणि हर्ष यांनी 2019 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांचा जयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला आहे. त्यानंतर चार वर्ष या दोघांनी सुखी संसार केला. मात्र 2024 पासून त्यांच्यात मतभेद होऊ लागले आणि तेव्हापासून त्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. इन्स्टाग्रामवरील सोन्या अयोध्याच्या एका क्रिप्टिक पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिलं, "मला कोणीतरी विचारले की, तू तुझी बाजू सांगणार नाहीस का? त्यावर मी उत्तर देत म्हणाले, माझी बाजू देवाला माहिती आहे. तेवढं पुरेसे आहे. "
सोन्या अयोध्या सध्या तिच्या कामामध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे. तिने आजवर अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. चाहते आता तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.