'पुष्पा' फेम साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) कायम आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत राहिला आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपट केले आहे. अलिकडेच त्याचा 'पुष्पा 2' चित्रपट सुपरहिट ठरला आहे. आता मात्र अल्लू अर्जुन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तो एका फॅनला सेल्फी द्यायला नकार देताना दिसत आहे.
अभिनेता 'वेव्हज 2025'साठी मुंबईत आला होता. तेव्हा तो मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. तेव्हाचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, अल्लू अर्जुन विमानतळावर दिसताच एक चाहता त्याच्याकडे सेल्फी काढण्यासाठी येतो. मात्र अल्लू अर्जुन त्याला नकार देतो. अल्लू अर्जुन कारमधून उतरून पुढे येत असतो, तेव्हा चाहता काढण्यासाठी येतो. मात्र अल्लू अर्जुन त्याची पाठ थोपटून सेल्फीसाठी नकार देतो. यानंतर अल्लू अर्जुनचा बॉडीगार्ड त्याला बाजूला करतो.
अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काही नेटकरी अल्लू अर्जुनच्या वागण्याचे समर्थन करत आहेत. तर काही लोक त्याला आला असल्याचे बोले जात आहे. अभिनेता अल्लू अर्जुनच्या या कृतीमुळे त्याला ट्रोल देखील करण्यात येत आहे.
अल्लू अर्जुनचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अल्लू अर्जुन 'AA22xA6' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुनचा मोठा चाहता वर्ग आहे. अल्लू अर्जुनचे इन्स्टाग्रामवर 28.2 मिलियन फॉलोअर्स आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने अल्लू अर्जुनला खूप लोकप्रियता मिळवून दिली. या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकली.