Maharashtra Live Update : संजय शिरसाठांनी मंत्रीपद सांभाळत येत नसेल तर राजीनामा द्यावा: सचिन खरात
Sarkarnama May 04, 2025 08:45 PM
Sanjay Shirsat : दलित आणि आदिवासींचा निधी लाडकी बहिण योजनेला वळवल्यामुळे व्यक्त केला संताप

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठांवर रिपाइं नेते सचिन खरात यांनी टीका केली आहे. दलित आणि आदिवासींचा निधी लाडकी बहिण योजनेला वळवल्यामुळं सचिन खरात संतापले. संजय शिरसाठांना मंत्रीपद सांभाळता येत नसेल, तर राजीनामा द्या, अशी मागणी सचिन खरातांनी केलीय आहे.

Sanjay Shirsat : मंत्री शिरसाट यांनी आपल्याच सरकारला घेरले

विधानसभा निवडणुकीच्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांचा रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्ये 100 दिवसांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अन् मंत्री आदिती तटकरे यांना पहिला क्रमांक मिळाला आहे. त्यांना 100 पैकी 80 टक्के गुण मिळाले आहे. त्यावरुन शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याच सरकारला घेरले आहे. आमच्या खात्याचा निधी वर्ग करण्यात आला. मग त्यांचा नंबर वन आला. आम्हाला काम करण्याची संधी मिळाली नाही तर आमचा उल्लेख 100 दिवसांच्या कार्यक्रमात कसा होणार? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला आहे.

HSC Result 2025 : प्रतीक्षा संपली ! बारावीचा उद्या निकाल

बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बारावीचा निकाल उद्या ५ मे रोजी जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकतीच तशी घोषणा केली आहे. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहाता येईल.

Karuna Sharma : धनंजय मुंडेंकडून मला जीवे मारण्याची धमकी : करुणा शर्मांचा गंभीर आरोप

धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला आहे. कोर्टात त्यांनी तशी लेखी तक्रार केली आहे. तुझे 18 तुकडे करणार अशी धमकी फोनद्वारे आपल्याला धनंजय मुंडे यांनी दिली.12 दिवसांपूर्वी मला धमकी देण्यात आली आहे. असा गंभीर आरोप करुणा मुंडे-शर्मा यांनी केला आहे. अजून मी मुंडे कुटुंबाबद्दल 50 टक्के पण तोंड उघडले नाही. उघडायला लाऊ नका असंही करुणा मुंडे म्हणाल्या.

Rahul Gandhi : राहुल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत

राहुल गांधी यांनी संसदेत मनुस्मृतीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर साधुसंतांसह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधी यांना हिंदू धर्मातून बहिष्कृत करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेने एकच खळबळ उडाली आहे.

15 मे पर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च 2025 दरम्यान दहावी आणि बारावीची परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात असून 15 मे पर्यंत निकला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत सद्भावना यात्रेला प्रारंभ

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या परभणीत पोखरणी ते परभणी सद्भावना यात्रेला सुरुवात करण्यात आली. या यात्रेमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. आज दिवसभरात 20 किलोमीटरचा प्रवास करून ही यात्रा आज सायंकाळी परभणीत पोहोचणार आहे

India imposes complete ban on imports from Pakistan : भारताकडून पाकिस्तानवर संपूर्ण आयात बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तासोबत होणाऱ्या सर्व प्रकरचा व्यापार भारताने थांबवला आहे. तसेच पाकिस्तानवर संपूर्ण आयातबंदी लागू केली.

अजित पवार अहिल्यानगरमध्ये संग्राम जगतापांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या वडिल माजी आमदार अरुण काका यांचे निधन दोन दिवसांपूर्वी झाले. संग्राम जगताप यांचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत. जगताप कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अजित पवार संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.

Maharashtra ST Labor Union : उद्यापासून ST कामगार संघटनेचं दोन दिवसीय अधिवेशन

उद्यापासून महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचं 57 वे दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला 50 हजार एसटी कर्मचारी संघटनेतील कर्मचारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षांनी दिली आहे.

Shivendraraje Bhosale : पिढीला चित्रपटातून इतिहास कळतोय याचं दु:ख

आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास चित्रपटातून कळतोय ही बाब दुर्दैवी असून याचं आम्हाला दुःख वाटतं, असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलं आहे. सांगलीत शिवोत्सव 2025 या सोहळ्यात बोलताना त्यानी हे वक्तव्य केलं. काही महिन्यापूर्वी छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नवीन पीढीला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम कळला ही एकप्रकारे खेदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट

पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट देण्यात आला होता. अशातच जगभरातील भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानला साई मंदिर पाईप बॉम्बने उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. या धमकीनंतर साई संस्थानसह पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे.

Pahalgam Terror Attack : ओमर अब्दुल्ला यांनी घेतली PM मोदींची भेट घेतली

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेली ही बैठीक अत्यंत महत्वपूर्ण मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धातास बैठक सुरु होती. या बैठकीत जम्मू काश्मीरमधील सुरक्षेसंदर्भातील परिस्थीतसह विविध मुद्यांवर चर्चा झाली.

Vikhe Patil Meet Amit Shah : राधाकृष्ण विखे पाटील पुत्रासह अमित शहांच्या भेटीला

भाजप नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र माजी खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.