आता BYD ने कळसच केला, आधी आणली खड्ड्यावरुन उडी मारणारी कार, आता आणली थेट पोहणारी कार
GH News May 04, 2025 10:06 PM

टेस्ला ते लँड रोव्हर आणि मर्सिडिज सारख्या कंपन्या ज्याचा कधी विचारही करु शकत नाहीत असे काय चीनी बीवायडी कंपनीने केले आहे. या कार कंपनीने असे काही केलेय की तुम्ही हडबडून जाल. आता या कंपनी अशी इलेक्ट्रीत कार तयार केली आहे की जी चक्क पाण्यात तरंगते. या कारला तुम्ही पाण्यात ड्राईव्ह करुन ३६० डिग्री फिरवूनही घेऊन जाऊ शकता…

बीआयडी या चीनी कंपनीने आता जम्प मारणारी Yangwang U9 कार बाजारात आणली होती. ही कार अनोख्या सस्पेन्शन सिस्टीमवर आधारीत होती. त्यामुळे ती रस्त्यांच्या खड्ड्यांवरुन उडी मारत त्यांना चुकवत चालू शकते. ही कार प्रचंड वेगात असतानाही चार मीटर अंतराची उडी मारु शकते. आता कंपनीने पाण्यातून पोहत धावणारी Yangwang U8 कार तयार केली आहे.

येथे पाहा पोस्ट –

कशी आहे पोहणारी इलेक्ट्रीक कार Yangwang U8?

बीवायडी कंपनीने Yangwang U8 कार बनवून सर्वांनाच आश्चर्यात टाकले आहे. इलेक्ट्रीक कार डिझाईनच्या प्रकारात या कारने सर्वांना मागे टाकले आहे. ही कार पाण्यात ३ किमी प्रति तास वेगाने धावू शकते. एवढेच नाही तर ३० मिनिटे ती आरामात पाण्यात तरंगू शकते.तसेच या कारमध्ये अनेक सुरक्षेचे फिचर्स दिले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रीक कार असूनही आपल्या शॉक लागत नाही.

ही लक्झरी इलेक्ट्रीक कार १२०० हॉर्स पॉवर जनरेट करु शकते. या कार संदर्भात बीवायडीचे म्हणणे आहे की ही कार इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये खूपच मदतगार होऊ शकते. या कारचे अनेक व्हिडीओ या आधीपासूनच व्हायरल होत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.