पुरंदर विमानतळ आंदोलनाला रक्तरंजित वळण
Webdunia Marathi May 04, 2025 10:45 PM

पुरंदर येथे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाला सात गावांकडून विरोध होत आहे. शेतकऱ्यांचा विरोध असून देखील शनिवारी प्रशासनाकडून विमानतळाच्या जागेचे ड्रोन ने सर्वेक्षण करण्यात आले. याला स्थानिकांनी कडा विरोध केला. दरम्यान पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. या मध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. असे ग्रामस्थांनी सांगितले.

ALSO READ:

पुरंदर तालुक्यातील मुंजवडी, उदाचीवाडी, वनपुरी, खानवडी, एखतपूर पारगाव आणि कुंभारवळण या 7 गावांत 2 हजार 673 हेक्टर भूसंपादन पुरंदर विमानतळासाठी केले जाणार आहे. याला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.
ALSO READ:

या गावांच्या भूसंपादनांपैकी एखतपूर गावात जमिनीचे सम्पादनासाठी ड्रोन ने सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी मोठा फौजफाटा देखील पोलिसांनी तैनात केला. या वेळी शेतकऱ्यांनी ड्रोन सर्वेक्षणाला विरोध करत ड्रोन पाडले. शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लाठीचार्ज केला या लाठीचार्ज मुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
ALSO READ:

या बाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर प्रचंड नाराजगी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या या ठिकाणी बळाचा वापर करणं अतिशय दुःखद आहे. शासनाने जनतेच्या भावना लक्षात ठेवून संयमाने काम करणे गरजेचे होते. या प्रकरणाला संवेदनशीलतेने हाताळण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Edited By - Priya Dixit

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.