आळेफाटा, ता. ४ : आळेफाटा (ता. जुन्नर) परिसरातील १९२ विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाली असून या सर्व विद्यार्थ्यांनी सह्याद्री करिअर ॲकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेतले असून या विद्यार्थ्यांची पोलिस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. अॅकॅडमीमध्ये सर्व प्रकारचे खडतरप्रशिक्षण पूर्ण केले असून यामध्ये एक विशेष भाग म्हणजे एकाच रूममध्ये राहून पोलिस भरतीची तयारी करत असताना एकाच वर्षी आठ जिवलग मित्रांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. यामध्ये विशेष करून शुभम परंडवाल, आकाश कुमदाळे, अक्षय गुंजाळ, चैतन्य साबळे, कौशल तामाणे, ऋषिकेश दातखिळे, अक्षय वैराळ, रोहित डावखर या आठ जिवलग मित्रांची राज्यातील विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी चांगल्या पदावर पोलिस दलात नियुक्ती झाली आहे. या विद्यार्थ्यांना मयूर डुंबरे, गीताराम गायकर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
अतिशय गरीब कुटुंबातून आलेली ही सर्व मुले आज राज्य पोलिस दलात आपले कर्तव्य बजावणार आहेत. एकाच रूममध्ये राहून पोलिस भरतीची तयारी आळेफाटामध्ये या मुलांनी केली. पोलिस दलात निवड होऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज त्यांनी केले आहे.
मयूर डुंबरे, सह्याद्री करिअर ॲकॅडमी