5 लाखांमध्ये कार शोधताय का? ‘हे’ खास पर्याय जाणून घ्या
GH News May 05, 2025 04:08 PM

तुम्हाला कार खरेदी करायची आहे का? कार खरेदी करायची आहे पण बजेट कमी आहे का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. भारतात स्वत:ची कार खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. प्रत्येकाला गाडी असावी अशी इच्छा असते आणि त्या कारमध्ये ते आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत फिरू शकतात, पण अनेकदा बजेटअभावी हे स्वप्न पूर्ण होत नाही. कारण गाड्यांच्या किमती खूप वाढल्या आहेत. पण तुम्ही कार घेऊ शकतं, कसं ते पुढे वाचा.

तुम्ही बाजारात चांगली कार खरेदी करण्यासाठी गेलात तर तुम्हाला किमान 10 लाख रुपयांची गरज आहे. मात्र आजही भारतात अशा 3 कार आहेत, ज्या जवळपास 5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये येऊ शकतात. या कारमध्ये बेसिक फीचर्स उपलब्ध आहेत. चांगली गोष्ट म्हणजे या कार तुम्हाला ऊन आणि पावसापासून वाचवू शकतात. इतकंच नाही तर त्यांच्या आत तुम्हाला बेस्ट मायलेज मिळतं. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कार आहेत.

मारुती ऑल्टो K10

मारुती ऑल्टो K10 ही एक परवडणारी एंट्री-लेव्हल कार आहे जी किंमतीसाठी पुरेशी जागा, फिट आणि फिनिश आणि उपकरणे प्रदान करते. हे इंधन कार्यक्षम आहे, पुरेशी कार्यक्षमता प्रदान करते आणि चांगली ड्राइव्हबिलिटी प्रदान करते. या कारच्या बेस मॉडेलची किंमत दिल्लीत 4.73 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार पेट्रोलसह 24.39 किमी प्रति लीटर मायलेज देते.

Renault Kwid

फ्रेंच कंपनीने भारतात विकलेली ही सर्वात स्वस्त कार आहे. दिल्लीत Renault Kwid ची ऑन रोड किंमत 5.31 लाख ते 7.38 लाख रुपयांपर्यंत आहे. याची एक्स शोरूम किंमत 4.70 लाख ते 6.45 लाख रुपयांदरम्यान आहे. क्विड CNG मध्ये येते. या कारमध्ये मॉडर्न डिझाइन पाहायला मिळते. 5 लोकांसाठी पुरेशी जागा आहे. ही कार 22 किमी प्रति लीटर मायलेज देते.

Maruti Suzuki S-Presso

Maruti Suzuki S-Presso ही मारुतीची हॅचबॅक कार आहे, जी अगदी SUV सारखी दिसते. या कारमध्ये 5 लोकांसाठी पुरेशी जागा, उत्कृष्ट ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आले आहे. खराब रस्त्यांवर ही कार आरामात धावू शकते. मारुती एस-प्रेसोची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलची किंमत 6.12 लाख रुपयांपर्यंत जाते. दोन्ही किंमती एक्स-शोरूम आहेत. यामध्ये आजनुसार सर्व आधुनिक फीचर्स उपलब्ध आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.