बाजार उघडताच शेअर ५% घसरला, ब्रोकरेज फर्म्सनीही या कारणामुळे रेटिंग केले कमी; नवीन लक्ष्य किंमत जाणून घ्या
Kotak Mahindra Bank shares : सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात चांगली तेजी दिसून येत आहे. असे असले तरी काही शेअर्समध्ये मात्र कंपनीसंदर्भातील घडामोडींमुळे घसरण दिसून येत आहे. असाच एक शेअर म्हणजे कोटक महिंद्रा बँक होय. शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच आज बँकेच्या शेअरमध्ये ५ टक्क्याहून अधिक पडझड झाली. कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये झालेली घसरण बँकेच्या मार्च तिमाहीच्या निकालांमुळे झाली असल्याचे म्हटले जाते. कारण बहुतेक बाजार विश्लेषकांना बँकेच्या निकालामध्ये अपेक्षित आकडेवारी दिसलेली नाही. त्यामुळे अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्सचे रेटिंग डाउनग्रेड केले आहे. आज सकाळी कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स ५.२३ टक्क्यांनी घसरून २,०७१ रुपयांवर व्यवहार करत होते, जे निफ्टी ५० आणि निफ्टी बँकेतील सर्वाधिक नुकसानीत असलेले शेअर्स होते. तसेच, या वर्षी आतापर्यंत या शेअरने सुमारे १६ टक्के परतावा दिला आहे. निकाल निराशाजनकमार्च तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) वार्षिक आधारावर ५.४% वाढ झाली, परंतु या कालावधीत बँकेच्या निव्वळ नफ्यात १४% घट झाली. बँकेची मालमत्ता गुणवत्ता स्थिर राहिली असली तरी, वार्षिक आणि तिमाही आधारावर तरतुदी वाढल्या. ब्रोकरेज हाऊसेसनी रेटिंग केले कमी
- जागतिक ब्रोकरेज फर्म CLSA ने तिमाही निकालांनंतर कोटक महिंद्रा बँकेचे शेअरचे रेटिंग "अंडरपरफॉर्म" वरून "होल्ड" केले आहे. तसेच, त्यांनी शेअरची लक्ष्य किंमत पूर्वीच्या २,१२५ रुपयांवरून थोडी वाढवून २,२२५ रुपये केली आहे. CLSA ने बँकेच्या नफ्याचा अंदाज ३% ने कमी करून ५% केला आहे. यामध्ये बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न कमी राहून खर्चात वाढ असल्याचे गृहितक आहे.
- नोमुरानेही शेअरसाठी रेटिंग "बाय" वरून "न्यूट्रल" केले आहे परंतु त्याची लक्ष्य किंमत आधीच्या २,११० रुपयांवरून २,२०० रुपये केली आहे.
- नुवामाने कोटक बँकेचे शेअर्स "बाय" वरून "होल्ड" केले आहेत परंतु त्यांची लक्ष्य किंमत २,०४० रुपयांवरून २,३५० रुपयांपर्यंत वाढवली आहे.
ठेवींची वाढ कमीकोटक बँकेची ठेवींची वाढ आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेपेक्षा कमी आहे. याशिवाय, बँकेसमोर नफा विरुद्ध वाढ यांचे संतुलन साधण्याचे आव्हान आहे.कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स सध्या सुमारे ४४ विश्लेषकांद्वारे कव्हर केले जातात. यापैकी २९ विश्लेषकांनी या शेअरला "बाय" रेटिंग दिले आहे. तर १० जणांनी ते "Hold" अशी शिफारस केली आहे आणि ५ जणांनी "SELL" करण्याची शिफारस केली आहे.