Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड चोर आहे...; नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूड इंडस्ट्रीची पोलखोल करत केला मोठा आरोप
Saam TV May 05, 2025 10:45 PM

Nawazuddin Siddiqui on Bollywood : नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय अभिनेता आहे आणि सध्या तो त्याच्या 'कोस्टाओ' या चित्रपटाचे प्रमोशन मध्ये व्यग्र असून सोशल मिडीयावर चर्चेत आहे. आता प्रमोशन दरम्यान, नवाजुद्दीनने बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल एक सत्य सांगितले आहे. त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीला चोर म्हणत आपल्या इंडस्ट्रीत सर्जनशीलतेचा अभाव आहे.

बॉलिवूडमधील असुरक्षिततेबद्दल नवाज म्हणाला, 'आपल्या मागील इंडस्ट्रीत ५ वर्षे असेच घडत आहे आणि जेव्हा लोक कंटाळतात तेव्हा ते सोडून देतात. खरंतर, असुरक्षितता खूप वाढली आहे. त्यांना वाटतं की जर एखादा फॉर्म्युला फायदेशीर ठरत आहे तर त्यानुसारच काम करत तो चालू ठेवा, तो लोकप्रिय ठेवा आणि त्याहूनही दयनीय गोष्ट म्हणजे चित्रपटाचे २,३,४ सिक्वेल येऊ लागले आहेत. यामुळे क्रेटिव्हिटी संपते.

बॉलिवूड इंडस्ट्री चोर आहे

अभिनेता पुढे म्हणाला, 'बॉलिवूड इंडस्ट्री सुरुवातीपासूनच चोर आहे. आम्ही गाणी चोरली, आम्ही कथा चोरली. आता चोर क्रेटिव्ह कसे असू शकतात? आम्ही दक्षिणेकडून चोरी केली, कधी इथून, कधी तिथून. अनेक हिट चित्रपटांमध्येही चोरीचे दृश्य असतात. चोरी करणे अत्यंत सामान्य करुन ठेवल आहे म्हणूनच चांगले काम करणारे अनुराग कश्यपसारखे अभिनेते आणि दिग्दर्शक काम सोडत आहेत.

च्या '' या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये तो एका कस्टम अधिकाऱ्याची भूमिका नवाज साकारत आहे जो सोन्याच्या तस्करीच्या कारवाईत करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सेजल शाह करत आहेत. या चित्रपटात प्रिया बापट, किशोर, हुसेन दलाल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट ZEE5 वर उपलब्ध आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.