सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये सातारा जिल्ह्याचा निकाल ९२.७६ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ०.८७ टक्क्याने घसरला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.३३ टक्के लागला असून, कोल्हापूर विभागात निकालाच्या टक्केवारीत सातारा जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७ टक्क्यांनी अधिक आहे. फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेस जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३ हजार १५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामधील ३० हजार ७५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९२.७६ टक्के आहे. जिल्ह्यात ३०३ कनिष्ठ महाविद्यालये असून, ५२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली होती.
बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील पुन:प्रविष्ट एक हजार ९२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची निकालाची टक्केवारी ४९.१२ टक्के आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा ९४.४० टक्के निकाल लागला असून, विभागात पहिला क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात १७ हजार ३०८ मुलांपैकी १५ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या निकालात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ७ टक्क्यांनी अधिक आहे.
फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेस जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३ हजार १५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यामधील ३० हजार ७५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९२.७६ टक्के आहे. जिल्ह्यात ३०३ कनिष्ठ महाविद्यालये असून, ५२ परीक्षा केंद्रांवर परीक्षा झाली होती. बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यातील पुन:प्रविष्ट एक हजार ९२ विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ५३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांची निकालाची टक्केवारी ४९.१२ टक्के आहे.
कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा ९४.४० टक्के निकाल लागला असून, विभागात पहिला क्रमांक मिळवला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात १७ हजार ३०८ मुलांपैकी १५ हजार ४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.२९ टक्के आहे. १५ हजार ९१९ मुलींपैकी १५ हजार २९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.५६ असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.