Instant Breakfast Idea: फक्त ५ मिनिटांत बनवा झटपट आणि चविष्ट 'दही चटणी टोस्ट'!
esakal May 06, 2025 01:45 PM

How To Make Dahi Chutney Toast In 5 Minutes: आठवड्याच्या सुरुवातीला एकदम घाई-गडबड असते. अशातच जर तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि काहीतरी झटपट व चविष्ट खायचं असेल, तर ही "दही चटणी टोस्ट" रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. गरमागरम टोस्ट आणि तोंडाला पाणी आणणारी दही चटणी मिळून एक भन्नाट कॉम्बिनेशन तयार करतं. चला तर मग पाहूया ही सोपी रेसिपी.

साहित्य
  • १ कप दही

  • १/२ टीस्पून लाल तिखट किंवा रेड चिली फ्लेक्स

  • १/४ टीस्पून मिरी पूड

  • चवीनुसार मीठ

  • थोडीशी कोथिंबीर

  • २-३ लसूण पाकळ्या

  • १-२ हिरव्या मिरच्या

  • ब्रेड स्लाइसेस

  • लोणी/ बटर/तूप

कृती
  • एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात लाल तिखट, मिरी पूड आणि मीठ घाला.

  • मिक्सरमध्ये लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर सोबत थोडंसं पाणी घालून वाटून घ्या.

  • हे वाटण दह्यात मिसळा आणि सर्व नीट एकत्र करा.

  • आता ब्रेडचे स्लाइसेस या मिश्रणात दोन्ही बाजूंनी बुडवा.

  • तवा गरम करून त्यावर लोणी/ बटर/तूप घाला आणि ब्रेड स्लाइस दोन्ही बाजूंनी खरपूस टोस्ट करून घ्या.

  • गरमागरम दही चटणी टोस्ट तयार!

ही चवदार रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहा सोबत किंवा लहान मुलांसाठी डब्यातही परफेक्ट आहे. कमी वेळात आणि कमी साहित्य वापरून तयार होणारा हा हेल्दी आणि टेस्टी पर्याय नक्कीच ट्राय करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.